शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:33 IST

"आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही."

इस्रायलनेइराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. मात्र इराणकडून करण्यात आलेले सर्वच्या सर्व ड्रोन हल्ले इस्रायल आणि जॉर्डनच्या सैन्याने यशस्वीपणे हाणून पाडले. इराणी ड्रोन हाणून पाडण्यासाठी जॉर्डनकडून इस्रायली सैन्याला विशेष मदत मिळत आहे. खरे तर, या भागात जॉर्डन हा इस्रायलचा खास सहकारी आहे आणि त्याला सातत्याने मदत करत असतो. गेल्या वर्षीही इस्रायलच्या दिशेने जाणारे मिसाइल्स आणि ड्रोन जॉर्डनने रोखले होते. मुस्लीम बाहुल्य जॉर्डनसंदर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह (जॉर्डन किंग अब्दुल्ला- II) यांना पैगंबर मोहम्मद यांचे वंशज मानले जाते.

जॉर्डनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या सैन्याने आज सकाळच्या सुमारास आपल्या हवाई हद्दीत प्रवेश केलेले अनेक मिसाइल्स रोखले. या मिसाइल आणि ड्रोनच्या सहाय्याने इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. मात्र जॉर्डनने ते हवेतच  हाणून पाडले. महत्वाचे म्हणजे, जॉर्डनने त्यांची हवाई सीमाही तात्पुरती बंद केली आहे. 

आमची हवाई हद्द म्हणजे, युद्धाचे मैदान नाही - यासंदर्भात भाष्य करताना जॉर्डन म्हणाला, आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही. इराण-इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच जॉर्डनचे हे विधान केले आहे. जॉर्डनच्या एका बाजूला इस्रायल आणि त्याने कब्जा केलेला वेस्ट बँक आहे. तर दुसऱ्या बाजूला इराणचा शेजारी इराक आहे. यामुळे इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणच्या दृष्टीने जॉर्डनची हवाई हद्द महत्वाची आहे.

खरे तर, जॉर्डनने १९९४ मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. असे करणारा तो दुसरा अरब देश बनला. तेव्हापासून जॉर्डनचे इस्रायलसोबत अत्यंत जवळचे गुप्तचर आणि सुरक्षा संबंध आहेत. जॉर्डन हा अमेरिकेचा विशेष मित्र देखील आहे. अशा परिस्थितीत, इराणी हल्ल्यांदरम्यान तो इस्रायलसाठी भिंत बनतो.

खरे तर, जॉर्डनने १९९४ मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. असे करणारा तो दुसरा अरब देश बनला. तेव्हापासून जॉर्डनचे इस्रायलसोबत अत्यंत जवळचे गुप्तचर आणि सुरक्षा संबंध आहेत. जॉर्डन हा अमेरिकेचा विशेष मित्र देखील आहे. अशा परिस्थितीत, इराणी हल्ल्यांदरम्यान तो इस्रायलसाठी भिंत बनून उभा राहतो आणि इस्रायलला उघडपणे मदत करतो.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध