शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Modi Trump Meeting: "आम्ही एकत्र येणं म्हणजे 'एक और एक ग्यारह'; आमची ताकद विश्वाच्या कल्याणासाठी वापरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 04:34 IST

ट्रम्प यांच्याप्रमाणे मलाही भारतीयांच्या हिताला सर्वोच्च ठेवून काम करायचे आहे असं मोदींनी सांगितले.

वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिका भागीदारीतून जनतेचं हित साधलं जाईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात तसेच २०४७ पर्यंत भारत एक विकसित देश बनणं हे १४० कोटी भारतीयांचा संकल्प आहे. आमच्या एकत्र येण्याचा अर्थ 'एक और एक ग्यारह' आहे. मी भारतीयांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल अभिनंदन करतो असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी मला तिसऱ्यांदा सत्ता सोपवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा जनतेच्या सेवेची संधी मिळाली. आम्ही समान ऊर्जा आणि उत्साहासह एकत्र काम करू. ट्रम्प यांच्या पूर्वीच्या ४ वर्षाचा अनुभव पाहता त्याच उत्साहाने आम्ही पुढे वाटचाल करू. अमेरिकेत हाऊडी मोदी आणि भारतात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची मला आजही आठवण होते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही आम्ही त्याच वेगाने काम करू. पुढील ४ वर्ष भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दुप्पटीने मजबूत करू. ट्रम्प यांच्याप्रमाणे मलाही भारतीयांच्या हिताला सर्वोच्च ठेवून काम करायचे आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेव्हा ट्रम्प मेक अमेरिका ग्रेट अगेन बोलतात, प्रत्येकाला त्यातून प्रेरणा मिळते. भारतही 'विकसित भारत २०४७' देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष होतील तोपर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प त्याला आज नवी गती आणि नवी ऊर्जा मिळतेय. अमेरिका जगातील सर्वात जुना लोकशाही देश आणि भारत महान लोकशाही असलेला देश यामुळे आमच्या दोघांची भेट म्हणजे १ प्लस १, २ नव्हे तर एक और एक ग्यारह आहे आणि ही ताकद विश्वाच्या कल्याणासाठी कामाला येईल. मी माझ्या मित्राचे पुन्हा आभार मानतो, आपण परत एकदा प्रगतीच्या दिशेने नवं शिखर गाठण्यासाठी पुढे जाऊ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत