मिसाईलचा पाऊस आणि इमर्जन्सी! इराण-इस्रायलमध्ये महायुद्ध पेटलं; काय आहे 'फतह-ए-खैबर'चा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:35 IST2026-02-28T15:32:37+5:302026-02-28T15:35:04+5:30

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने 'ऑपरेशन फतह-ए-खैबर'ची अधिकृत घोषणा केली आहे.

Missile rain and emergency! A world war broke out between Iran and Israel; What is the meaning of 'Fatah-e-Khaibar'? | मिसाईलचा पाऊस आणि इमर्जन्सी! इराण-इस्रायलमध्ये महायुद्ध पेटलं; काय आहे 'फतह-ए-खैबर'चा अर्थ?

मिसाईलचा पाऊस आणि इमर्जन्सी! इराण-इस्रायलमध्ये महायुद्ध पेटलं; काय आहे 'फतह-ए-खैबर'चा अर्थ?

मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने 'ऑपरेशन फतह-ए-खैबर'ची अधिकृत घोषणा केली आहे. या ऑपरेशन अंतर्गत इराणनेइस्रायलच्या प्रमुख शहरांवर मिसाईल्सचा वर्षाव सुरू केला असून, संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी स्पष्ट इशारा दिला आहे की, हा केवळ सुरवात असून अमेरिका आणि इस्रायलला या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल.

काय आहे 'फतह-ए-खैबर'चा इतिहास?

इराणने आपल्या या लष्करी मोहिमेला दिलेले नाव अत्यंत प्रतीकात्मक आणि ऐतिहासिक आहे. 'फतह' या अरबी शब्दाचा अर्थ 'विजय' असा होतो. ७ व्या शतकात सौदी अरेबियातील मदीना जवळ 'खैबर' नावाचा एक अभेद्य किल्ला होता. ऐतिहासिक संदर्भांनुसार, ही लढाई ज्यू आणि मुस्लिम समुदायामध्ये झाली होती. या युद्धात पैगंबर मुहम्मद यांचे चुलत भाऊ आणि जावई हजरत अली यांनी खैबर किल्ल्याचे जड लोखंडी दार हाताने उखाडून फेकत विजय मिळवला होता. इराण हा शिया बहुल देश असून हजरत अली हे शिया धर्माचे इमाम मानले जातात. त्यामुळेच इस्रायलविरुद्धच्या या युद्धाला इराणने 'खैबरचा विजय' असे नाव दिले आहे.

इस्रायलचे 'लायन्स रोअर' ऑपरेशन

इराणच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'ऑपरेशन लायन्स रोअर' सुरू केले आहे. जून २०२५ मध्ये इस्रायलने 'रायझलिंग लायन्स' नावाने मोहीम राबवली होती, त्याचाच हा पुढील टप्पा मानला जात आहे. आयडीएफच्या मते, इराणने केलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलची वायुसेना सज्ज आहे.

इराणचे शक्तीप्रदर्शन: २००० मिसाईल्स आणि घातक ड्रोन्स

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, इराणकडे सध्या २००० हून अधिक मिसाईल्सचा मोठा साठा आहे. याशिवाय इराणने चीनसोबत CM-300 या अत्यंत विनाशकारी मिसाईलसाठी करार केला आहे. इराणकडे जगातील सर्वात घातक मानले जाणारे 'शाहेद ड्रोन' आहेत, ज्याचा वापर या युद्धात होण्याची शक्यता आहे.

या दोन देशांमधील संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित नसून तो जागतिक महायुद्धाचे रूप धारण करतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान-इज़राइल संघर्ष बढ़ा: मिसाइल हमले, आपातकाल, 'फतह-अल-खैबर' का अर्थ।

Web Summary : ईरान ने 'फतह-अल-खैबर' ऑपरेशन शुरू किया, इज़राइल पर मिसाइलों से हमला किया, जिससे देशव्यापी आपातकाल लग गया। इस ऑपरेशन का ऐतिहासिक महत्व है। इज़राइल ने 'लायंस रोअर' से जवाबी कार्रवाई की। ईरान के पास मिसाइलों का बड़ा भंडार और घातक ड्रोन हैं, जिससे वैश्विक संघर्ष का डर बढ़ गया है। दुनिया अमेरिका की प्रतिक्रिया पर नजर रख रही है।

Web Title : Iran-Israel conflict escalates: Missile strikes, emergency declared, 'Fatah-al-Khaybar' explained.

Web Summary : Iran launches 'Fatah-al-Khaybar' operation, striking Israel with missiles, prompting a nationwide emergency. This operation has historical significance. Israel retaliates with 'Lions Roar'. Iran possesses a large missile arsenal and deadly drones, raising fears of a global conflict. The world watches America's response.