Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:33 IST2026-04-13T12:32:38+5:302026-04-13T12:33:26+5:30

US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी आता थेट स्ट्रेट ऑफ होर्मुजची नाकेबंदी करण्याची रणनीती आखली आहे.

Middle East War: America eye on Kharg Island, Bandar Abbas; Donald Trump's master plan to embarrass Iran | Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन

Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन

मध्य पूर्वेतील संघर्षाने आता गंभीर वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी आता थेट स्ट्रेट ऑफ होर्मुजची नाकेबंदी करण्याची रणनीती आखली आहे. अमेरिका केवळ होर्मुजची कोंडी करणार नाही, तर ईरानची तेल निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी खर्ग बेट आणि बंदर अब्बास सारख्या मोक्याच्या ठिकाणांना ब्लॉक करण्याचा प्लॅन आखत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा मुख्य उद्देश  तेल पुरवठा जागतिक बाजारपेठेपासून तोडणे हा आहे. खर्ग बेटावरून होणारी ईरानची ९० टक्के तेल निर्यात रोखण्यासाठी अमेरिका तिथे कडक पहारा किंवा लष्करी कारवाई करू शकते. इराणचे हे मुख्य व्यापारी बंदर असून, येथून होणारी जहाजांची ये-जा पूर्णपणे ठप्प करण्याची तयारी सुरू आहे. जगातील २० टक्के तेल पुरवठा ज्या स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होतो, तिथे इराणचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अमेरिका नाटो आणि इतर मित्रदेशांवर दबाव टाकत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण आहे. सोमवारी आशियाई शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. गुंतवणूकदारांना भीती आहे की, जर इराणने प्रत्युत्तर म्हणून होर्मुजचा मार्ग पूर्णपणे बंद केला, तर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे जागतिक महागाईचा भडका उडेल.

इराणचा अमेरिकेला इशारा

याआधी इराणने होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांकडून प्रति जहाज सुमारे २० लाख डॉलर्स (अंदाजे १८ कोटी रुपये) शुल्क आकारून काही प्रमाणात सवलत दिली. मात्र, ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेमुळे आता हा मार्ग युद्धभूमीत बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान,  इराणच्या तेल प्रतिष्ठानांवर हल्ला झाला तर, त्याचे अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी आधीच दिला आहे.

Web Title : ट्रंप की मास्टरप्लान: अमेरिका का ईरान के तेल निर्यात पर निशाना, मध्य पूर्व में तनाव

Web Summary : अमेरिका, होर्मुज जलडमरूमध्य को अवरुद्ध करके और खर्ग द्वीप और बंदर अब्बास जैसे प्रमुख तेल निर्यात केंद्रों को लक्षित करके ईरान को पंगु बनाने का लक्ष्य बना रहा है। इस कदम से वैश्विक तेल आपूर्ति खतरे में है और मध्य पूर्व में तनाव बढ़ सकता है, जिससे कच्चे तेल की कीमतें और वैश्विक मुद्रास्फीति बढ़ सकती है। ईरान ने गंभीर परिणाम की चेतावनी दी है।

Web Title : Trump's Masterplan: US Targets Iran's Oil Exports, Middle East Tensions Rise

Web Summary : The US aims to cripple Iran by blockading the Strait of Hormuz and targeting key oil export hubs like Kharg Island and Bandar Abbas. This move threatens global oil supplies and could escalate Middle East tensions, potentially leading to higher crude oil prices and global inflation. Iran warns of severe consequences.