आतापर्यंतचं सर्वात कमी वेळ टिकलेलं लग्न...! वराकडून झाली एक चूक, वधूनं विवाहानंतर 3 मिनिटांत घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 19:46 IST2024-07-23T19:45:27+5:302024-07-23T19:46:58+5:30

...हे ऐकूण वधूला राग आला आणि तिने न्यायाधिशांकडे हे लग्न रद्द करण्याची विनंती केली. यासाठी न्यायाधिशांनीही सहमती दर्शवली आणि त्यांचे लग्न तीन मिनिटांतच रद्द केले.

middle east kuwait The shortest marriage ever A mistake made by the husband couple divorces within 3 minutes of getting married | आतापर्यंतचं सर्वात कमी वेळ टिकलेलं लग्न...! वराकडून झाली एक चूक, वधूनं विवाहानंतर 3 मिनिटांत घेतला घटस्फोट

आतापर्यंतचं सर्वात कमी वेळ टिकलेलं लग्न...! वराकडून झाली एक चूक, वधूनं विवाहानंतर 3 मिनिटांत घेतला घटस्फोट

लग्नाशी संबंधित नव-नवे आणि अनोखे किस्से सातत्याने समोर येत असतात. अनेक वर्षे सोबत राहिलेले पती-पत्नी अचानक विभक्त झाले, अशा घटनाही आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतील. आज आम्ही आपल्याला अशाच एका अनोख्या घटनेसंदर्भात सांगत आहोत. ही घटना आहे कुवेतमधील. येथे एका जोडप्याने लग्नानंतर अवघ्या तीन मिनिटांत घटस्फोट घेतला.

इंडिपेंडंट इंडीने दिलेल्या वृत्तानुसार, एका जोडप्याने पती-पत्नी घोषित झाल्यानंतर केवळ तीन मिनिटांतच घटस्फोट घेतल्याची घटना घडली आहे. लग्न समारंभानंतर वराने वधूचा अपमान केल्याने हा घटस्फोट झाला. संबंधित वृत्तानुसार, न्यायालयात लग्नाची सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे जोडपे बाहेर आले. यावेळी वधू चालताना अडखळली आणि पडली तेव्हा नवरदेव तिला मूर्ख म्हणाला.

...म्हणून वधू संतापली?
हे ऐकूण वधूला राग आला आणि तिने न्यायाधिशांकडे हे लग्न रद्द करण्याची विनंती केली. यासाठी न्यायाधिशांनीही सहमती दर्शवली आणि त्यांचे लग्न तीन मिनिटांतच रद्द केले. याला देशातील सर्वात कमी काळ टिकलेले लग्न, संबोधले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, ही घटना 2019 मधील असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट्सचा पाऊसही पाडत आहेत. एक यूजरने लिहिले आहे, मी एका लग्नात गेलो होतो, तेथे नवरदेव आपल्या भाषेत पूर्ण वेळ पत्नीची मजाक करत होता. याच्या पत्नीनेही तसेच करायला हवे होते, जे त्याच्या पत्नीने केले. आणखी एकाने लिहिले, 'जर तो सुरवातीलाच असे वागला असेल तर, त्याला सोडणेच योग्य आहे.' अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर येत आहेत.

Web Title: middle east kuwait The shortest marriage ever A mistake made by the husband couple divorces within 3 minutes of getting married