तरूण १० मिनिटात प्यायला दीड लीटर कोल्ड ड्रिंक, ६ तासांनंतर मृत्यू, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:50 AM2021-09-25T11:50:41+5:302021-09-25T11:52:44+5:30

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या तरूणाने गरमीत स्वत:ला थंड करण्यासाठी बॉटलभर कोल्ड ड्रिंक प्यायलं.

Man died after drink one litre cold drink in 10 minutes heatwave China | तरूण १० मिनिटात प्यायला दीड लीटर कोल्ड ड्रिंक, ६ तासांनंतर मृत्यू, जाणून घ्या कारण

तरूण १० मिनिटात प्यायला दीड लीटर कोल्ड ड्रिंक, ६ तासांनंतर मृत्यू, जाणून घ्या कारण

Next

चीनमध्ये डॉक्टरांचा दावा आहे की, हीटवेव दरम्यान १० मिनिटे कथितपणे १.५ लीटर कोल्ड ड्रिंक प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतकाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण त्याचं वय २२ वर्ष आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या तरूणाने गरमीत स्वत:ला थंड करण्यासाठी बॉटलभर कोल्ड ड्रिंक प्यायलं. ज्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागलं होतं आणि सूज आल्याची समस्या झाल्यावर बीजिंगचे चाओयांग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी तरूणाच्या हृदयाचा स्पीड जास्त होता आणि ब्लड प्रेशर कमी झालं होतं. तो वेगाने श्वास घेत होता.

क्लिनीक आणि रिसर्च इन हेपेटोलॉजी अॅन्ड गॅस्ट्रोएंटरोलॉजी जर्नलमध्ये मृत्यूची माहिती देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला वेगाने किंवा घाईघाईने कोल्ड ड्रिंक पिणं महागात पडलं. कारण याने शरीरात न्यूमेटोसिस होतं. लगेच जास्त कोल्ड ड्रिंक प्यायल्याने व्यक्तीच्या आतड्यांमद्ये आसामान्य गॅस तयार होतो. 

डॉक्टरांचं मत आहे की, असं केल्याने तरूणाला ऑक्सीजन कमी पोहोचलं. ज्यामुळे हेपेटिक इस्किमिया(लिवर शॉक) ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.  रिपोर्टचे प्रमुख लेखक कियांग हे म्हणाले की, डॉक्टरांनी त्याची गॅसची समस्या लगेच सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा औषध दिलं. पण १८ तासांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: Man died after drink one litre cold drink in 10 minutes heatwave China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.