नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Babar Azam: पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमला स्टार फलंदाज रोहित शर्माची नक्कल करणे चांगलेच महागात पडले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:06 IST2026-05-04T15:05:48+5:302026-05-04T15:06:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PSL 2026: Babar Azam Peshawar Zalmi Crowned Champions; Skipper Trolled for Mimicking Rohit Sharma Iconic Trophy Celebration | नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पाकिस्तान सुपर लीग २०२६ च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाबर आझमच्या पेशावर झल्मीने हैदराबाद किंग्समेनचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पेशावरने पहिल्यांदाच हा किताब जिंकला असून, बाबरच्या कारकिर्दीतील ही तिसरी ट्रॉफी ठरली आहे. मात्र, विजयानंतर ट्रॉफी स्वीकारताना बाबरने भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माची आयकॉनिक सेलिब्रेशनची नक्कल केली. मात्र, त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी बाबर आझम जेव्हा स्टेजवर ट्रॉफी घेण्यासाठी जात होता, तेव्हा त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमधील आयकॉनिक सेलिब्रेशनची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेटकऱ्यांच्या मते बाबरला ही स्टाईल नीट जमली नाही. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कॉपी कॅट म्हणत त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

अंतिम सामन्यात हैदराबाद किंग्समेनचा संघ पूर्णपणे ढेपाळलेला पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ १८ षटकांत अवघ्या १२९ धावांत गारद झाला. पेशावर झल्मीने १३० धावांचे हे माफक लक्ष्य १५.२ षटकांत ५ विकेट्स राखून सहज पूर्ण केले. या विजयाचा खरा नायक ॲरॉन हार्डी ठरला. त्याने गोलंदाजीत ४ विकेट्स घेतले आणि फलंदाजी करताना नाबाद ५६ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली.

विजेतेपद मिळाले असले तरी, फलंदाज म्हणून बाबर आझमसाठी अंतिम सामना अत्यंत वाईट ठरला. तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक झाला. त्यामुळे बाबरची एका मोठ्या विक्रमाची संधी थोडक्यात हुकली. एकाच  हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ २ धावांची गरज होती. या हंगामात त्याने ५८८ धावा केल्या. २०२२ मध्ये फखर जमाननेही ५८८ धावा केल्या होत्या. जर बाबरने केवळ १ धाव काढली असती तर तो ऐतिहासिक विक्रम त्याच्या नावावर झाला असता.

Web Title : पीएसएल जीतने के बाद बाबर ने रोहित शर्मा की नकल की, ट्रोल हुए।

Web Summary : बाबर आज़म की पेशावर ज़ल्मी ने पाकिस्तान सुपर लीग का फाइनल जीता। रोहित शर्मा की नक़ल करने पर बाबर ट्रोल हुए। हारडी के प्रदर्शन से टीम जीती, पर बाबर पहली गेंद पर आउट हो गए।

Web Title : Babar's Rohit Sharma celebration copycat attempt trolled after PSL victory.

Web Summary : Babar Azam's Peshawar Zalmi won the Pakistan Super League final. His attempt to copy Rohit Sharma's celebration was trolled. Aaron Hardy's all-round performance secured the win, despite Babar's golden duck.