शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 20:17 IST

या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे एक ड्रोन नष्ट झाले आणि २५ सैनिक मारले गेले. पाकिस्तानी लष्कराच्या या तळावर कब्जा केल्याचाही दावा टीटीपीने व्हिडिओत केला आहे.

इस्लामाबाद - तहरीक ए तालिबान पाकिस्तान (TTP) ने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. टीटीपीच्या जवानांनी खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाक लष्कर तळाला टार्गेट केले. या हल्ल्यात २५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर ८ जवान जखमी झालेत. सोमवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला असं टीटीपीने म्हटलं परंतु अद्याप पाकिस्तानी लष्कर अथवा कुठल्याही इतर संस्थेने याची पुष्टी केली नाही.

द वॉइस ऑफ खुरासानने मंगळवारी टीटीपीचे निवेदन आणि हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला. त्यात टीटीपीने म्हटलं की, सोमवारी रात्री दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे एक ड्रोन नष्ट झाले आणि २५ सैनिक मारले गेले. पाकिस्तानी लष्कराच्या या तळावर कब्जा केल्याचाही दावा टीटीपीने व्हिडिओत केला आहे.

आसिफ यांनी दिली होती धमकी

पाकिस्तानी लष्करावर टीटीपीने अशावेळी हल्ला केल्याचा दावा केला आहे जेव्हा पाकिस्तानी सरकारकडून या गटाला धमक्या दिल्या जात होत्या. पाकिस्तानी संरक्षण मत्री ख्वाजा आसिफ यांनी टीटीपीला धमकी दिली होती. कुठल्याही परिस्थितीत आमचे सरकार टीटीपीसोबत चर्चा करणार नाही. पाकिस्तान केवळ अफगाणिस्तानातील तालिबानसोबत चर्चा करेल असं आसिफ यांनी स्पष्ट केले होते. 

टीटीपी दिर्घकाळापासून पाकिस्तानी आर्मीला टार्गेट करत आहे. विशेषत: अफगाणिस्तान सीमेपासून नजीक या संघटनेने पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्षाचे एक कारण टीटीपीही हेही आहे. पाकिस्तानी अनेक वर्षापासून अफगाणिस्तानवर तहरीक ए तालिबान टीटीपीला आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे. पाकिस्तान आणि टीटीपी यांच्यातील तणाव वाढला आहे. टीटीपी प्रमुख मुफ्ती नूर वली महसूदला याला टार्गेट करत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला. त्यानंतर महसूदने व्हिडिओ जारी करत जिवंत असल्याचे सांगत पाकिस्तानी लष्कराला धडा शिकवणार अशी धमकी दिली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : TTP claims attack: 25 Pakistani soldiers killed, base captured.

Web Summary : TTP claims a major attack in South Waziristan, killing 25 Pakistani soldiers and capturing a military base. Pakistan hasn't confirmed the claim. Tensions escalate amid threats and accusations between Pakistan and Afghanistan regarding TTP.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान