शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:13 IST

Israel Attack Iran Nuclear: इस्रायलने इराणच्या सगळ्यात मोठा युरेनियम साठा असलेल्या ठिकाणासह तब्बल दहा ठिकाणी हवाई हल्ले केले. यात इराणचे तब्बल महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. 

Israel attack Iran Update: इस्रायलनेइराणविरोधात ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत मोठा प्रहार केला आहे. इस्रायलनेइराणच्या चार आण्विक केंद्रासह सहा लष्करी ठिकाणांवर हल्ला चढवला. यात इराणची महत्त्वाची माणसे मारले गेली आहेत. इराणच्या लष्करप्रमुखांसह सहा नामवंत अणुशास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इस्रायलने इराणमधील नतांज आण्विक केंद्र आणि इतर ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे.  इस्रायलने हा हल्ला करत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मोठा प्रहार केला आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले इराणचे अणुशास्त्रज्ञ

इस्रायलने जे हवाई हल्ले केले, त्यात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची जबाबादारी असलेले सहा अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. 

अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरजा जोल्फाघारी, सय्यद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीजादेह, मोहम्मद मेहदी तहरनेची आणि फेरेदून अब्बासी अशी या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या इराणच्या अणुशास्त्रज्ञांची नावे आहेत. 

सहा अणुशास्त्रज्ञ कोण आहेत?

अब्दुल हमीद मिनोउचहर : हे तेहरान शहरातील शहीद बेहेश्ती विद्यापीठामध्ये अणु ऊर्जा प्राध्यापक आहेत. युरेनियम संवर्धन आणि प्रक्रिया या विषयात तज्ज्ञ आहेत. नतांजमधील सेंट्रिफ्यूज तंत्र विकसित करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. 

त्यांच्या संशोधनामुळेच इराणला २० टक्के शुद्धता असलेले युरेनियम संवर्धन करणे शक्य झाले. अणु ऊर्जा आणि अण्वस्त्र तयार करण्यासाठी युरेनियम महत्त्वाचा घटक आहे. मिनोउचहर रिअॅक्टर डिझाईन आणि अणु इंधन तयार करण्यात तज्ज्ञ होते. 

अहमदरजा जोल्फाघारी : शहीद बेहेश्ती विद्यापीठात अहमदरजाही अणु अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांच्यामुळेच इराणची सेंट्रिफ्यूज क्षमता दुप्पट झाली आहे. त्यामुळे युरेनियम संवर्धनाचा वेग वाढवता येतो. त्यांनी अत्याधुनिक सेंट्रिफ्यूज डिझाईन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 

सय्यद अमीरहोसेन फेक्ही : हेही शहीद बेहेश्ती विद्यापीठात प्राध्यापक होते. अणु ऊर्जा संयत्र विकसित करण्याबद्दल ते संशोधन करत होते. त्यांनी अराक भारी जल संयत्र विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. हे प्लुटोनियमचे उत्पादन करण्यासाठी वापरले जाऊ शकते. 

मोत्लाबीजादेह : इराणच्या अणु ऊर्जा संघटनेचे वरिष्ठ अभियंता होते. मिसाईल तंत्रज्ञानाशी संबंधित अण्वस्त्र संशोधनात त्यांचा सहभाग होता. त्यांनी ट्रिगर तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम केले होते. त्यामुळे इराणला अण्वस्त्र तयार करण्याच्या उंबरठ्यावर जाता आले. ते मिसाईल आणि अणु विकासात तज्ज्ञ होते. 

वाचा >>अणु करार करा, अन्यथा आणखी विनाशाला तयार राहा...डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

मोहम्मद मेहदी तहरेनची : इस्लामिक आझाद विद्यापीठाचे ते अध्यक्ष होते. भौतिकशास्त्रात त्यांनी संशोधन केले होते. अणु संशोधन अभ्यासक्रमात आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी अनेक नव्या संशोधकांना प्रशिक्षण दिले. इराणच्या अणु ऊर्जा कार्यक्रम राबवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. 

फेरेदून अब्बासी : इराणच्या अणु ऊर्जा संघटनेचे ते माजी प्रमुख होते. शहीद बेहेश्ती विद्यापीठात ते प्राध्यापकही होते. इराण्या अणु ऊर्जा कार्यक्रमाचे ते शिल्पकार म्हणून ओळखले जातात. २०१० मध्ये एका बॉम्ब हल्ल्यात ते वाचले होते. युरेनियम संवर्धन आणि अण्वस्त्र संशोधनाचे ते नेतृत्व करत होते. अण्वस्त्र विकसित करण्यापासून त्यांना संयुक्त राष्ट संघाने बंदी रोखले होते. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध