शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

बापरे! कोरोनामुळे आईच्या गर्भातच झाला बाळाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 12:34 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धडकी भरवणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. इस्रायलमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोनामुळेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला इस्रायलच्या मीर मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. महिलेला दोन दिवस ताप येत होता आणि तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली होती. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 'ही एक दुर्मिळ घटना आहे आणि इस्रायलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे' अशी माहिती दिली. मीर मेडिकल सेंटरचे डॉक्टर ब्रोश यांनी वाईनेट वेबसाइटशी संवाद साधताना कोरोना व्हायरसमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे असं म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, रुग्णालय या बाळाच्या मृत्यूचं कारण सांगण्यास असमर्थ आहे. पण या गोष्टीची जास्त शक्यता आहे की बाळाचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळेच झाला आहे. याआधी देखील इस्रायलमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या बाळाचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली असून हजारो नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

Corona Vaccine ची कमाल, अनेक आजारांवर ठरतेय 'संजीवनी', लोकांचे 'हे' त्रास झाले दूर

संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. कोरोनाची लस ही फक्त कोरोना व्हायरसपासूनच बचाव करत नाही तर इतर आजारांवरही फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे. जगभरात ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचे इतर आजारही दूर झाले आहेत. रिपोर्टनुसार, कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आता नव्या रिसर्चमधून दिसून आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायलDeathमृत्यू