इराणचा पलटवार! अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर केला बॉम्ब वर्षाव, बहरीनमध्ये २१ सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:33 IST2026-03-08T13:31:02+5:302026-03-08T13:33:15+5:30

Iran America War: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळे आणि समुद्रात तैनात असलेल्या युद्धनौकांना लक्ष्य केले जात आहे. इराणच्या लष्कराने आता अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर हल्ला केला असून, त्यात २१ जवान मारले गेल्याचा दावा केला आहे. 

Iran retaliates! Bombs hit fifth US warship, kills 21 soldiers in Bahrain | इराणचा पलटवार! अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर केला बॉम्ब वर्षाव, बहरीनमध्ये २१ सैनिक मारले

इराणचा पलटवार! अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर केला बॉम्ब वर्षाव, बहरीनमध्ये २१ सैनिक मारले

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलयुद्ध दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इस्रायलकडूनइराणच्या तेल साठवलेल्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेकडूनही हवाई हल्ले सुरूच असून, इराणने जोरदार पलटवार करत अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर बॉम्ब वर्षाव केला. यात २१ सैनिक मारले गेले असल्याचा दावा इराणी लष्करी दलाने केला आहे. 

इराणच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर हवाई हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या नौदल आणि इराणी लष्करातील संघर्ष वाढल्यानंतर इराणने थेट युद्धनौकेवर हल्ले केले. अमेरिककडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणच्या लष्कराचेही नुकसान झाले आहे. 

अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहोत. संघर्ष सुरू असलेल्या क्षेत्रातील अमेरिकन नागरिकांना माहिती आणि मदत करण्यासाठी काम करत आहोत. सर्व नागरिकांनी सावध रहावे आणि स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे. 

इस्रायलचा लेबनानमधील हॉटेलवर हल्ला

इस्रायलने लेबनानची राजधानी बेरूतमधील एका हॉटेलवर हल्ला केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. या हवाई हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. 

लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने या घटनेबद्दल आपल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, दक्षिण लेबनान आणि बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांमध्ये युद्धामुळे जे लोक बेघर झाले आहेत, त्यांच्या राहण्यासाठी हे हॉटेल वापरले जात होते. त्याच हॉटेलवर इस्रायलने हल्ला केला. 

या हल्ल्यानंतर लोक बाहेर पडताना दिसले. दरम्यान, इस्रायलच्या लष्करी दलाने टेलिग्रामवर म्हटले आहे की, आम्ही अचूक हल्ला केला. आमचा निशाणा कुद्स फोर्सचा मुख्य कमांडर होता. 

सहा महिने युद्ध लढू शकतो -इराण

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरने म्हटले आहे की, आमचे सशस्त्र सैन्य याच वेगाने कमीत पुढील सहा महिने युद्ध सुरू ठेवून शकते. फार्स न्यूज या वृत्तसंस्थेने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आयआरजीसीने असा दावा केला आहे की, आतापर्यंत युद्धात वापरलेल्या मिसाईल्स या सुरुवातीला विकसित केलेल्या होत्या. 

आता पुढील टप्प्यात इराण अत्याधुनिक आणि दूरपर्यंत मारा करणाऱ्या मिसाईल्स वापरल्या जातील, असेही इराणी सैन्याने म्हटले आहे.

Web Title : ईरान का पलटवार: अमेरिकी युद्धपोत पर बमबारी, 21 सैनिक मारे

Web Summary : ईरान ने बहरीन में अमेरिकी युद्धपोत पर बमबारी करने का दावा किया, जिसमें 21 सैनिकों की मौत हो गई। अमेरिका और इज़राइल के साथ तनाव बढ़ रहा है। इज़राइल ने लेबनान के एक होटल पर हमला किया, जिसमें चार लोगों की मौत हो गई। ईरान का दावा है कि वह छह महीने तक युद्ध जारी रख सकता है।

Web Title : Iran Retaliates: Bombs US Warship, Claims 21 Soldiers Killed

Web Summary : Iran claims to have bombed a US warship in Bahrain, killing 21 soldiers, amidst escalating tensions with America and Israel. Israel struck a Lebanon hotel, killing four. Iran claims it can sustain war for six months.