इराणचा अमेरिकन टेक कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:34 IST2026-04-03T15:33:55+5:302026-04-03T15:34:14+5:30

Iran Attack Oracle: अमेरिकन टेक कंपनी Oracle गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Iran attacks American tech company 'Oracle'; Direct warning to 'these' companies including Google, Meta | इराणचा अमेरिकन टेक कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...

इराणचा अमेरिकन टेक कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...

Iran Attack Oracle: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा विस्तार टेक्नॉलॉजी क्षेत्रापर्यंत झाल्याचे दिसत आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने दुबईमधील अमेरिकन टेक कंपनी Oracle कॉर्पोरेशनच्या डेटा सेंटरवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, UAE सरकारकडून अद्याप या हल्ल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

Oracle पुन्हा चर्चेत...

Oracle कंपनी अलीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे चर्चेत आली आहे. कंपनीने भारतातून सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, तर जागतिक स्तरावर 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचे सांगितले जात आहे. आता या कंपनीचे नाव हल्ल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.

इराण Oracle ला टार्गेट का मानते?

माहितीनुसार Oracle चे अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत करार आहेत. तसेच कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन यांचे इस्रायली सरकारशीही चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. यामुळे इराण Oracle वर हल्ला केल्याचा अंदाज आहे.

अमेरिकन टेक कंपन्यांवर वाढता धोका

दरम्यान, इराणने आधीच इशारा दिला आहे की, अमेरिका आणि इस्रायलने हल्ले थांबवले नाहीत, तर ते अमेरिकन टेक कंपन्यांवर हल्ले करतील. इराणने ज्या कंपन्यांची नावे घेतली आहेत, त्यात Intel,Amazon,Meta Platforms,,Microsoft,Apple Inc.,Google आणि IBM या कंपन्यांचा समावेश आहे. इराणने या कंपन्यांच्या ऑफिस आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे. तसेच या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिस रिकामे करावे असेही सांगितल्याचे वृत्त आहे.

Amazon AWS डेटा सेंटरवर आधीच हल्ला?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी घटना म्हणजे बहरीनमध्ये Amazon Web Services (AWS) डेटा सेंटरवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे Amazon च्या क्लाउड सेवांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणचा आरोप आहे की, अमेरिकन टेक कंपन्या अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य व गुप्तचर यंत्रणांना मदत करत आहेत. विशेषतः क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर यांचा वापर डिजिटल शस्त्रांसारखा होत असल्याचा आरोप इराणने केला आहे. 

Web Title : ईरान का ओरेकल पर हमला; गूगल, मेटा समेत अन्य को चेतावनी

Web Summary : ईरान के आईआरजीसी ने बढ़ते तनाव के बीच ओरेकल के दुबई डेटा सेंटर पर हमले का दावा किया है। उन्होंने ओरेकल के अमेरिकी रक्षा संबंधों और संस्थापकों के इज़राइल कनेक्शन का हवाला दिया। गूगल, मेटा और अन्य को संभावित हमलों की चेतावनी दी गई है, जिसमें अमेरिकी/इजरायली सैन्य खुफिया जानकारी और डिजिटल हथियारों के समर्थन का आरोप लगाया गया है।

Web Title : Iran attacks Oracle; Warns Google, Meta, and others: Report

Web Summary : Iran's IRGC claims attack on Oracle's Dubai data center amid rising tensions. They cite Oracle's US defense ties and founders Israel links. Google, Meta and others are warned of potential attacks, alleging support for US/Israeli military intelligence and digital weaponization.