भारत-बांगला सीमावाद संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2015 03:29 IST2015-06-07T03:22:03+5:302015-06-07T03:29:46+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार काही क्षेत्रातील देवाणघेवाणीतून ४१ वर्षे जुन्या असलेल्या सीमा वादावर तोडगा निघू शकतो.

Indo-Bangla border crossing ended | भारत-बांगला सीमावाद संपला

भारत-बांगला सीमावाद संपला

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार काही क्षेत्रातील देवाणघेवाणीतून ४१ वर्षे जुन्या असलेल्या सीमा वादावर तोडगा निघू शकतो. पर्यायाने द्विपक्षीय संबंधांतील अडथळेही दूर होऊ शकतात. याखेरीज मोदी यांनी भारत आणि बांगलादेशमधील दोन बससेवांचे उद्घाटन केले आणि बांगलादेशास भारताकडून दोन अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात येथील विद्यापीठात भित्तीपत्रक लावल्याबद्दल बांगलादेशातील कट्टर विचारांची इस्लामी संघटना ‘हिज्ब उत तहरीर’च्या तीन विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
उभय देशांनी मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत जमीन सीमा कराराशी (लँड बॉर्डर अ‍ॅग्रिमेंट-एलबीए) संबंधित दस्तावेजांची देवाणघेवाण केली. एलबीएला गेल्या महिन्यात भारतीय संसदेने एकमताने संमत केले होते. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शाहिदूल हक यांनी दस्तावेजांवर स्वाक्षरी केली. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी (पान २ वर)


बससेवेचा प्रारंभ
भारत आणि बांगला देशात संपर्क वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी, शेख हसीना आणि ममता बॅनर्जी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवून बससेवा सुरू केली. ही बस कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलाँग-गुवाहाटीदरम्यान चालेल.

मोदींसोबत ममतांचा कारने प्रवास
ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फारसे चांगले संबंध नसलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यासोबत कारने करारावर स्वाक्षरी झाली त्या ठिकाणापर्यंत प्रवास केला. मोदी व बॅनर्जी हे बांगलादेशला स्वतंत्रपणे गेले व त्यांचा मुक्कामही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये होता.

स्वातंत्र्यापासून रेंगाळत राहिलेल्या समस्येची आम्ही सोडवणूक केली आहे. उभय देशांनी सीमेची हद्दबंदी नक्की केली आहे. यामुळे सीमा अधिक सुरक्षित व दोन्ही देशांतील नागरिकांच्या जीवनास अधिक स्थैर्य येईल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Indo-Bangla border crossing ended