शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भारत दहशतवादाला झुकणार नाही - मोदी

By admin | Updated: March 31, 2016 04:48 IST

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि हल्ल्याचा निषेध केला.

ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि.३१ - तीन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियममधील ब्रसेल्स एक्सपोमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि हल्ल्याचा निषेध केला. तसेच, दहशवाद हा मानवतेला आव्हान देत असून कोणात्याही एका राष्ट्राला किंवा धर्माला देत नाही. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.  
भारत दहशतवादाला झुकणार नाही आणि झुकण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या वर्षात ९० देश दहशतवादाला बळी पडले आहेत. फक्त बॉम्ब आणि बंदुकांनी दहशतवाद संपणार नाही, त्यासाठी समाजाला जागरुक केले पाहिजे. दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जात नाही किंवा कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, अशा शब्दात त्यांनी दहशतवादाचा निषेध केला. 
 
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही मुद्दे ...
- दिशा योग्य असेल आणि पॉलिसी स्पष्ट असेल तर भारताला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. 
- पाच कोटी गरिब लोकांना गॅस कनेक्शन देण्यात येणार. 
- माझ्या विनंतीवरुन ९० लाख लोकांनी गॅस सब्सिडी सोडली.
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त नागरिकांना गॅस सिलेंडर मिळाले.
- सर्वाधिक जास्त दुध उत्पादन २०१५ मध्ये झाले.
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त वीज आणि कोळसा उत्पादन झाले.
- देशातील १८,००० गावांना वीज पुरवठा केला.
- आजच्या काळात शेतक-यांना युरियासाठी रांगेत उभारावे लागत नाही.
- देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वाधिक युरियाचे उत्पादन २०१५ मध्ये झाले आहे.
- सव्वा चार लाख शाळांमध्ये टॉयलेट बांधले.
- मी स्वत:ला पंतप्रधान मानत नाही, तर सेवक मानतो. 
- सलग दोन वर्षे पाऊस कमी पडला, परंतु भारतातील अर्थव्यवस्थेत तेजी कायम आहे.
- आर्थिक मंदीच्या काळात जगाचे लक्ष भारताकडे आहे.
- दहशवाद हा मानवतेला आव्हान देत असून कोणात्याही एका राष्ट्राला किंवा धर्माला देत नाही. 
- दहशतवादाचा सर्व देशांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे.
- भारत दहशवादाला झुकणार नाही आणि झुकण्याचा प्रश्नच येत नाही.
- फक्त बॉम्ब आणि बंदुकांनी दहशतवाद संपणार नाही.
- दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला जागरुक केले पाहिजे.
- यूएनला सुद्धा माहित नाही दहशतवाद काय आहे ते. 
- दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जात नाही किंवा कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही.