भारताने पाठ फिरवली अन् रशिया चीनवर मेहरबान झाला; ड्रॅगनला मिळतंय पाण्याच्या भावात कच्चे तेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:34 IST2026-02-07T19:33:35+5:302026-02-07T19:34:41+5:30

एकेकाळी रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आता मागे हटला असून, त्याचा थेट फायदा चीनला होताना दिसत आहे.

India turned its back and Russia became kind to China; Dragon is getting crude oil at the price of water! | भारताने पाठ फिरवली अन् रशिया चीनवर मेहरबान झाला; ड्रॅगनला मिळतंय पाण्याच्या भावात कच्चे तेल!

भारताने पाठ फिरवली अन् रशिया चीनवर मेहरबान झाला; ड्रॅगनला मिळतंय पाण्याच्या भावात कच्चे तेल!

जागतिक तेल बाजारात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकेकाळी रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आता मागे हटला असून, त्याचा थेट फायदा चीनला होताना दिसत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या मोठ्या व्यापार करारानंतर भारताने रशियन तेलाची आयात निम्म्यावर आणली आहे. परिणामी, आपला साठा विकण्यासाठी रशियाने आता चीनसाठी तिजोरी उघडली असून, विक्रमी सवलतीत तेल विकण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेची 'ती' अट आणि भारताची कोंडी

भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण व्यापारी करार झाला आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लागणारे शुल्क कमी केले आहे. मात्र, वाशिंग्टनने यासाठी एक मोठी अट घातली होती – ती म्हणजे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे किंवा अत्यंत कमी करावे. आपल्या आर्थिक हितासाठी आणि अमेरिकेसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने रशियन तेलाऐवजी आता अमेरिका आणि व्हेनेझुएलासारख्या देशांकडे मोर्चा वळवला आहे.

चीनची लागली 'लॉटरी'; रशियाकडून घसघशीत सवलत

भारताने खरेदी कमी केल्यामुळे रशियाचे तेल जहाजांमध्ये पडून आहे. हा साठा रिकामा करण्यासाठी रशियाने चीनला आकर्षित करण्यासाठी सवलतींचा पाऊस पाडला आहे.

ESPO Blend तेल: यावर आता प्रति बॅरल ९ डॉलरची सूट मिळत आहे (आधी ही सूट ७-८ डॉलर होती).

Urals ग्रेड तेल: जे तेल पूर्वी भारत मोठ्या प्रमाणात घ्यायचा, त्यावर आता चीनला प्रति बॅरल तब्बल १२ डॉलरपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

चीनने मोडले खरेदीचे सर्व रेकॉर्ड

स्वस्त तेलाच्या संधीचा चीनने पुरेपूर फायदा उचलला आहे. जानेवारी २०२६ हा महिना रशिया आणि चीनच्या तेल व्यापाराच्या इतिहासातील सर्वात मोठा महिना ठरला आहे. आकडेवारीनुसार, चीनने जानेवारीत रशियाकडून समुद्रमार्गे दररोज विक्रमी १७ ते १८.६ लाख बॅरल तेल आयात केले आहे. विशेष म्हणजे, रशियन तेल इतके स्वस्त मिळत आहे की चिनी कंपन्यांनी आता इराणकडून तेल घेणेही कमी केले आहे.

भारत पूर्णपणे नातं तोडणार का?

तज्ज्ञांच्या मते, भारत रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करणार नाही. 'जेपी मॉर्गन'च्या विश्लेषकांनुसार, अमेरिकेचा दबाव असूनही भारत दररोज ८ ते १० लाख बॅरल तेल खरेदी करत राहील. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही घसरण मोठी आहे. जून २०२५ मध्ये भारत दररोज २० लाख बॅरल तेल विकत घेत होता, जे आता ११ लाख बॅरलपर्यंत खाली आले आहे. नोव्हेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

Web Title : भारत पीछे हटा, रूस ने चीन को सस्ते तेल से नवाज़ा!

Web Summary : अमेरिका के दबाव में भारत ने रूसी तेल का आयात घटाया, जिससे चीन को फायदा हुआ। रूस अब चीन को भारी छूट दे रहा है, जिससे वह शीर्ष खरीदार बन गया है। भारत अभी भी कुछ खरीदता है, लेकिन पहले से कम।

Web Title : India backs off, Russia favors China with cheap oil!

Web Summary : India reduced Russian oil imports due to US pressure, benefiting China. Russia now offers China record discounts, making it a top buyer. India still buys some, but less than before.