भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 08:44 IST2026-01-18T08:44:58+5:302026-01-18T08:44:58+5:30

गाझामधील युद्ध आपण संपवले तिथे शांतता प्रस्थापित होईल असे कोणालाही वाटले नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

India Pakistan war was stopped Donald Trump claims for the 80th Time | भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय

भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपण थांबवून लाखो लोकांचे प्राण वाचवले. हा आपल्यासाठी एक सन्मान असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. शुक्रवारी फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकेने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत जगभरात अनेक शांतता करार घडवून आणले. तसेच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संघर्ष थांबतून किमान १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय आपल्याला दिल्याचाही दावा केला. गाझामधील युद्ध आपण संपवले. तेथे शांतता प्रस्थापित होईल असे कोणालाही वाटले नाही. आता पश्चिम आशियात शांतता आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव रोखण्यात आपली महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. गेल्या वर्षी १० मेपासून आजपर्यंत त्यांनी हा दावा सुमारे ८० वेळा केला आहे. ट्रम्प यांनी केलेला हा दावा भारत सरकारने सातत्याने फेटाळला आहे.
 

Web Title : ट्रंप का दावा: भारत-पाक युद्ध रोका, लाखों जानें बचाईं

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प का दावा है कि उन्होंने भारत-पाक युद्ध को रोका और एक करोड़ लोगों की जान बचाई। उन्होंने कहा कि पाकिस्तान के पीएम ने उन्हें श्रेय दिया। भारत लगातार ट्रम्प के दावों का खंडन करता है।

Web Title : Trump Claims Credit: Stopped India-Pakistan War, Saved Millions

Web Summary : Donald Trump claims he prevented India-Pakistan war, saving a crore lives. He says Pakistan's PM credited him. India consistently denies Trump's claims regarding tensions.