शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 00:03 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १० टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ब्रिक्स देशांवर कर लादण्याची घोषणा केली.  लवकरच ब्रिक्स देशांवर १० टक्के कर लादला जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. व्हाईट हाऊस येथे त्यांच्या कॅबिनेट अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी, "लवकरच ब्रिक्सचा भाग असलेल्या सर्व देशांवर १० टक्के कर लादला जाईल, असं म्हटलं.

"जर ते ब्रिक्समध्ये असतील तर त्यांना निश्चितच १० टक्के अतिरिक्त कर भरावे लागतील कारण ब्रिक्सची स्थापना आपल्याला दुखावण्यासाठी, आपल्या डॉलरची अधोगती करण्यासाठी करण्यात आली होती. डॉलर सर्वात श्रेष्ठ आहे. आपण ते असेच ठेवूया. जर लोकांना आव्हान द्यायचे असेल तर ते करू शकतात. पण त्यांना त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. मला वाटत नाही की त्यापैकी कोणालाही ही किंमत मोजावीशी वाटेल," असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या विधानावरून हे स्पष्ट झालंयी की अमेरिका ब्रिक्स गटातील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्ध कठोर व्यापारी भूमिका स्विकारणार आहे. ब्रिक्स समूह जागतिक व्यापार आणि राजनैतिकतेमध्ये आपली पकड मजबूत करत असताना आणि अनेक नवीन देशांनीही त्यात सामील होण्यास रस दाखवलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह ब्रिक्स देशांसाठी अमेरिकन बाजारपेठांमध्ये प्रवेश महाग होऊ शकतो, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

मंगळवारी ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. अमेरिका तांब्याच्या आयातीवर ५० टक्के कर लादणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत ट्रम्प यांनी, "आज आम्ही तांब्यावर कारवाई करत आहोत," असं म्हटलं. यासोबतच ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीबाबत मोठे विधान केले. अमेरिका लवकरच औषधांवर मोठी घोषणा करेल आणि किमान एक वर्षानंतर त्यांच्यावर २०० टक्क्यांपर्यंतचे शुल्क लादले जाऊ शकते, असेही ट्रम्प म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका