लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:36 IST2026-01-20T12:35:40+5:302026-01-20T12:36:26+5:30

धार्मिक भेदभावामुळे किमान चार मुलांवर विकार्स ग्रीन प्रायमरी स्कूल सोडाण्याची वेळ आली आहे, असेही संस्थेने म्हटले आहे...

In London, an 8-year-old Hindu boy was forced to leave school for religious discrimination and tilak | लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं!

लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं!

इंग्लंडमध्ये एक अत्यंत धक्यादायक आणि घृनास्पद घटना घडली आहे. राजधानी लंडनमध्ये एका प्राथमिक शाळेत 8 वर्षांच्या हिंदू विद्यार्थ्यासोबत धार्मिक भेदभाव झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटिश हिंदू आणि भारतीय समुदायासाठी काम करणाऱ्या 'इनसाइट यूके' या संस्थेच्या अहवालानुसार, संबंधित मुलाला कपाळावर गंध (टिळक) लावल्याने शाळा सोडण्याची वेळ आली आहे. 'इनसाइट यूके'ने हे एका अल्पवयीन मुलाविरुद्ध 'पूर्णपणे अनुचित' वर्तन असल्याचेही म्हटले आहे. 

'शाळा प्रशासनाच्या वर्तनाने मुलगा भयभीत' -
शाळेच्या मुख्याध्यापकावर सुट्टीच्या वेळी मुलावर लक्ष ठेवल्याचा आरोप आहे, यामुळे संबंधित मुलगा प्रचंड भयभीत झाला होता आणि खेळ सोडून तो एकटाच राहू लागला. शाळा प्रशासनाने, गंध लावल्याने संबंधित विद्यार्थी मुलाकडून शाळेच्या जबाबदाऱ्यांही काढून घेतल्या. इनसाइट यूकेनुसार, जर हे आरोप खरे ठरले तर, समानता कायदा २०१० अंतर्गत धार्मिक भेदभावाचे हे स्पष्ट प्रकरण आहे. इनसाइट यूकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, "कोणत्याही मुलावर त्यांच्या श्रद्धेमुळे पाळत ठेवली जाऊ नये किंवा त्यांना वेगळे केले जाऊ नये. अशा अनुभवांचा मुलावर कायमचा भावनिक परिणाम होऊ शकतो."

"हिंदूंच्या धार्मिक प्रथांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले" -
माध्यमांतील वृत्तांनुसार, मुलाच्या पालकांनी आणि इतरही काही हिंदू पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रशासकांशी अनेक वेळा संपर्क साधला. त्यांनी हिंदू धर्मात गंध लावण्याचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शाळा प्रशासनाने या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आणि समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. इनसाइट यूकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, "संभाषणादरम्यान त्यांचा हेतू चांगला नव्हता. शाळेत हिंदू धार्मिक पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि त्यांना कमी लेखण्यात आले." एवढेच नाही तर, धार्मिक भेदभावामुळे किमान चार मुलांवर विकार्स ग्रीन प्रायमरी स्कूल सोडाण्याची वेळ आली आहे, असेही संस्थेने म्हटले आहे. याशिवाय, इनसाइट यूकेने स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात तक्रार केली आहे.
 

 

Web Title : लंदन: तिलक लगाने पर हिंदू बच्चे को स्कूल छोड़ने पर किया मजबूर

Web Summary : लंदन के एक स्कूल पर 8 वर्षीय हिंदू छात्र को तिलक लगाने के कारण स्कूल छोड़ने के लिए मजबूर करने का आरोप है। 'इनसाइट यूके' ने धार्मिक भेदभाव की सूचना दी है, जिससे हिंदू प्रथाओं पर सवाल उठाए गए और कई छात्रों का नाम कट गया। मामले की जांच जारी।

Web Title : London school forces Hindu boy to leave over forehead mark.

Web Summary : London school faces backlash after allegedly forcing an 8-year-old Hindu student to leave for wearing a Tilak. 'Insight UK' reports religious discrimination and a hostile environment questioning Hindu practices, leading to multiple withdrawals. Authorities are investigating.