शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खजिन्यात अडकले इम्रान खान; भेटवस्तू विकणे भोवले, तीन वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:40 IST

तोशखाना प्रकरण; पाकच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षांचा तुरुंगवास, तत्काळ अटक

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर शनिवारी अटक करण्यात आली. सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या निर्णयानंतर खान यांना ५ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.

इस्लामाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगात ठेवण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे अध्यक्ष यांच्यावरील संपत्तीची खोटी माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला जाणूनबुजून बनावट तपशील (तोशखाना भेटवस्तू) सादर केला. भ्रष्टाचार प्रकरणात ते दोषी आढळले आहेत,” असे  न्यायालय म्हणाले.

वस्तू विकून २० कोटी कमावलेnतोशखाना हा एक विभाग आहे; जेथे राज्यकर्ते व सरकारी अधिकाऱ्यांना इतर सरकारप्रमुख व परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. nखान यांनी अनेक महागड्या भेटवस्तू खरेदी करून नफा मिळविण्यासाठी त्या विकल्याचा आराेप हाेता. nतोशखानातील वस्तू २.५ कोटी रुपयांत खरेदी केली होती आणि ५.८ कोटी रुपयांत विक्री केल्याचे इम्रान खान यांनी आयोगाला सांगितले होते.nप्रत्यक्षात मात्र त्यांना २० कोटींपेक्षा जास्त नफा झाल्याचे आढळले.

हेलिकॉप्टरने हलवलेपंजाबचे माहिती मंत्री अमीर मीर यांनी एका निवेदनात सांगितले की, पोलिस इम्रान खान यांना इस्लामाबादला घेऊन जात आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादला नेले जात आहे. प्रतिकाराविना अटकखान यांना शनिवारी ताब्यात घेताना पोलिसांना कोणत्याही मोठ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही. १५० हून अधिक खटले खान यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. यांत भ्रष्टाचार, दहशतवाद आणि हिंसक निदर्शने आणि लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करणे अशा अनेक आरोपांचा समावेश आहे.  पत्नीचीही चाैकशीया प्रकरणी इम्रान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यावरही आराेप आहेत. त्यांचीही चाैकशी हाेणार आहे. आतापर्यंत त्यांना १३ वेळा तपास संस्थांनी नाेटीस दिली हाेती. मात्र, त्या एकदाही हजर झाल्या नाहीत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान