हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:20 IST2026-03-14T14:19:37+5:302026-03-14T14:20:27+5:30

अमेरिका आणि इस्रायलने इराणची लष्करी शक्ती नष्ट केल्याचा दावा केला असला तरी, इराणकडून अद्यापही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेत अतिरिक्त २५०० मरीन सैनिक आणि युद्धनौका रवाना केल्याने हे युद्ध अधिक भीषण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

How many deaths were there in the US-Israel and Iran war in 2 weeks How much damage was there You will be surprised to know the number | हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल

हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यात तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले असून तणावाचे वातावरण आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, यूएई आणि इराकमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ले चढवले.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन आठवड्यांच्या संघर्षात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक जीवितहानी इराणमध्ये झाली असून, सरकारी माध्यमाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात १२७० जणांचा मृत्यू झाला. तर संयुक्त राष्ट्रांतील इराणच्या राजदूताने ६ मार्चला दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा १३३२ वर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, 
या आकड्यांमध्ये, 4 मार्चला अमेरिकेने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या एका जहाजावर केलेल्याल्या हल्ल्यातील मृतांचा समावेश आहे की नाही, हे स्पष्ट नाही.

दरम्यान, १ मार्च रोजी अमेरिकन सैन्याने इराणच्या मिनाब शहरातील एका शाळेवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १७५ जणांना मृत्यू झाला होता. दुसरीकडे, लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ९८ मुलांसह ६८७ जण मारले गेले आहेत.

लष्करी आणि नागरी नुकसान -
इस्रायलमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून, दक्षिण लेबनॉनमध्ये दोन सैनिक मारले गेले आहेत. अमेरिकेने या युद्धात १३ सैनिक गमावले आहेत, ज्यात इराकवरील विमान अपघातातील ६ सैनिकांचा समावेश आहे. तसेच, सौदी अरबमधील अल-खर्ज येथील निवासी भागात झालेल्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युद्ध आणखी भडकण्याची शक्यता- 
अमेरिका आणि इस्रायलने इराणची लष्करी शक्ती नष्ट केल्याचा दावा केला असला तरी, इराणकडून अद्यापही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेत अतिरिक्त २५०० मरीन सैनिक आणि युद्धनौका रवाना केल्याने हे युद्ध अधिक भीषण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Web Title : US-इजरायल-ईरान संघर्ष: दो हफ़्तों में हजारों की मौतें, भारी नुकसान

Web Summary : अमेरिका-इजरायल-ईरान संघर्ष के दो हफ़्तों में 2,000 से ज़्यादा मौतें हुईं, जिनमें ज़्यादातर ईरान में हुईं। हमलों और जवाबी हमलों के जारी रहने से तनाव बढ़ रहा है, क्योंकि अमेरिका ने मध्य पूर्व में और सैनिक भेजे हैं। नागरिक और सैन्य हताहतों की सूचना है।

Web Title : US-Israel-Iran Conflict: Thousands Dead, Massive Damage in Two Weeks

Web Summary : Two weeks of US-Israel-Iran conflict has resulted in over 2,000 deaths, primarily in Iran. Attacks and counter-attacks continue, with potential for escalation as the US deploys more forces to the Middle East. Civilian and military casualties reported.