दुबई : अमेरिका आणि इस्रायलने ठार मारण्याची धमकी दिली असतानाही इराणने आपल्या सर्वोच्च नेतेपदी दिवंगत अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई यांची रविवारी उत्तराधिकारी म्हणून निवड केली. कोणतेही सरकारी पद भूषवलेले नसतानाही मोज्तबा यांना या पदासाठी संभाव्य उमेदवार मानले जात होते. मोज्तबा हे इराणमध्ये सार्वजनिकरीत्या फारसे दिसत नाहीत. सध्या सुरू असलेल्या युद्धातही ते सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत.
जन्म आणि पार्श्वभूमी
मोज्तबा यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद शहरात झाला, तेव्हा त्यांचे वडील अली खामेनेई हे शाह मोहम्मद रझा पहलवी राजवटीविरुद्ध आंदोलन करत होते. शाहचे पतन झाल्यानंतर खामेनेई कुटुंब तेहरानला गेले. मोज्तबा यांनी इराण-इराक युद्धात भाग घेतला. त्यांचे वडील १९८९ मध्ये सर्वोच्च नेता झाले आणि त्यानंतर कुटुंबाला प्रचंड संपत्ती व व्यवसायांवर नियंत्रण मिळाले.
वडिलांसोबत सत्ता वाढवली
सत्तेसोबत मोज्तबांची ताकदही वाढली. अमेरिकेचे सामरिक व राजनयिक दस्तऐवज विकिलिक्समुळे जगजाहीर झाले त्यात मोज्तबांचा उल्लेख ‘पडद्यामागचा खरा शक्तीमान’ असा केला गेला होता. मोज्तबांनी आपल्या वडिलांवरही पाळत ठेवल्याचा विकिलिक्समध्ये उल्लेख आहे. त्यांनी रिव्होल्युशनरी गार्डसोबत तसेच कुद्स फोर्स आणि बसीजसह या निमलष्करी दलासोबतही काम केले आहे.
निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोप
२००५ आणि २००९ मधील इराणमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पडद्यामागून पाठिंबा दिल्याचा आरोप मोज्तबांवर करण्यात आला होता.
Web Summary : Mojtaba Khamenei, son of Iran's Supreme Leader, is seen as his successor despite holding no official post. He gained power alongside his father, allegedly influencing elections and working with military forces. He's been described as a powerful figure operating behind the scenes.
Web Summary : ईरान के सर्वोच्च नेता के बेटे, मोज्तबा खामेनेई, बिना किसी आधिकारिक पद के भी उत्तराधिकारी माने जा रहे हैं। उन्होंने अपने पिता के साथ सत्ता हासिल की, चुनावों को प्रभावित करने और सैन्य बलों के साथ काम करने का आरोप है। उन्हें पर्दे के पीछे से काम करने वाली एक शक्तिशाली शख्सियत बताया गया है।