शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:20 IST

Viral News : तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेल्या अनोख्या मार्गाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

चीनमध्ये तुरुंगातील शिक्षा टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेल्या अनोख्या मार्गाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शांक्सी प्रांतातील एका महिलेने फसवणुकीच्या गुन्ह्यात मिळालेली पाच वर्षांची शिक्षा टाळण्यासाठी चार वर्षांत तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, आता तिची ही क्लुप्ती फोल ठरली असून, तिला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. चीनमध्ये या महिलेला चेन होंग या टोपण नावाने ओळखलं जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

नक्की काय आहे प्रकरण?चेन होंगला डिसेंबर २०२० मध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण तुरुंगात जाण्याऐवजी तिने चीनच्या एका कायद्याचा फायदा घेतला. या कायद्यानुसार, गर्भवती महिला आणि नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या मातांना तुरुंगाबाहेर शिक्षा भोगण्याची परवानगी आहे. या तरतुदीनुसार, गुन्हेगारांना दर तीन महिन्यांनी गर्भधारणा किंवा आरोग्याशी संबंधित अहवाल सादर करावा लागतो आणि स्थानिक सुधारणा संस्थांद्वारे त्यांची नियमित तपासणी केली जाते.

२०२० ते २०२४ या काळात चेनने एकाच पुरुषासोबत तीन मुलांना जन्म दिला, ज्यामुळे ती वारंवार तुरुंगातील शिक्षा टाळत राहिली. प्रत्येक गर्भधारणेमुळे तिला तुरुंगाबाहेर राहण्याची पात्रता मिळाली, कारण ती एकतर गर्भवती होती किंवा नवजात बाळाची काळजी घेत होती. पण मे २०२५ मध्ये एका नियमित तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना कळलं की चेन तिच्या नवजात बाळासोबत राहत नव्हती, आणि बाळाची कायदेशीर नोंदणी (हुको) तिच्या माजी पतीच्या बहिणीच्या नावावर होती.

तपास आणि शिक्षातपासात असंही समोर आलं की चेनने तिच्या पतीला आधीच घटस्फोट दिला होता. तिची पहिली दोन मुलं तिच्या माजी पतीसोबत राहत होती, तर तिसरं बाळ तिने तिच्या माजी पतीच्या बहिणीकडे दिलं होतं. स्थानिक वकिलांनी चेनवर तुरुंगातून वाचण्यासाठी गर्भधारणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि तिला तुरुंगात पाठवण्याची शिफारस केली. अखेरीस, चेनला तिची उर्वरित शिक्षा (सुमारे एक वर्ष) पूर्ण करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाचेन होंगचं प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं, जिथे लोकांनी तिच्या या युक्तीवर आश्चर्य आणि संताप व्यक्त केला. एका युजरने लिहिलं, "त्या तीन मुलांची मला दया येते, कारण त्यांचा जन्म फक्त त्यांच्या आईला तुरुंगातून वाचवण्यासाठी झाला." दुसऱ्या एकाने लिहिलं, "ती हवं तेव्हा गर्भवती होऊ शकते हे पाहून मी थक्क झालो." अनेक लोकांनी चीनी कायद्यातील या त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी केली.

यापूर्वीही असे प्रकार घडलेअशा प्रकारची युक्ती वापरणारी ही पहिली महिला नाही. २००५ मध्ये, एका दुसऱ्या चिनी महिलेने भ्रष्टाचारासाठी मिळालेली जन्मठेपेची शिक्षा टाळण्यासाठी दहा वर्षांत १४ वेळा गर्भवती असल्याचा दावा केला होता, त्यापैकी एक गर्भधारणा खोटी होती. अखेर तिला २०१५ मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchinaचीन