शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्पवरील हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन? शूटरला ४ लाखांचा अ‍ॅडवान्स दिल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:18 IST

Donald Trump Attack, Pakistan Connection: गेल्या महिन्यात १३ जुलैला ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता

Donald Trump Attack, Pakistan Connection: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या महिन्यात निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. या प्रकरणात आता पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमेरिकन गुप्तचर संस्था FBI ने आसिफ मर्चंट नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. आसिफच्या अटकेने या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे.

गेल्या महिन्यात १३ जुलैला ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. पण आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट येत आहे. एफबीआय म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने आसिफ मर्चंट नावाच्या पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. तो या हल्ल्याच्या कटात सामील असल्याचे सांगितले जात आहे.

FBIच्या कारवाईला वेग

FBI च्या म्हणण्यानुसार, ४६ वर्षीय आसिफने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती केली होती. त्याने त्याला पाच हजार अमेरिकन डॉलर्स (४.१९ लाख रुपये) अडवान्स दिले होते. एफबीआयने सांगितले की, आसिफ १२ जुलै रोजी अमेरिकेतून फरार होण्याचा प्रयत्न करत होता, पण वेळीच तो पकडला गेला. असिफला इराणने अमेरिकेत पाठवल्याचा दावाही एफबीआयने केला आहे. तो अंडर कव्हर एजंटही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिसकडे होती. पण आता एफबीआयने ज्या प्रकारे या हल्ल्यात इराण आणि पाकिस्तानचा अँगलही तपासात असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी