शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 9:34 AM

India China FaceOff: गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार चीनने भूतान आणि भारतातील सिक्कीमला लागून असलेल्या सीमेवर 2017 सारखीच हालचाल सुरु केली आहे.

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने अडविल्याने चीन खवळला आहे. यामुळे चीनच्या लष्कराने पुन्हा डोकलामकडे मोर्चा वलविला आहे. लडाखमधून माघार घेण्यावर चीनने सहमती दर्शविली आहे. मात्र, पेंगाँग आणि डोकलामवर चीनची वाईट नजर आहे. 

गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार चीनने भूतान आणि भारतातील सिक्कीमला लागून असलेल्या सीमेवर 2017 सारखीच हालचाल सुरु केली आहे. सरकारी रणनितीकारांनुसार पुर्वेकडील लडाखमध्ये तीन जागांवर मागे हटण्यास चीन राजी झाला आहे. मात्र, असे असले तरीही भारताची डोकेदुखी संपणारी नाहीय. यामुळे भारतीय लष्कर आणि कूटनीतिज्ज्ञ डोकलामच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

भारतासोबतच्या वादामध्ये चीन नेपाळसारखाच भुतानलाही ओढण्याच्या प्रयत्नात आहे. 2017 मध्ये चीनने भूतान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या डोकलामध्ये घुसून 73 दिवसांपर्यंत तणाव निर्माण केला होता. या काळता भारत भूतानच्या सीमेवरही चीनविरोधात उभा ठाकला होता. 

अखेर चीनला तिथून माघार घ्यावी लागली होती. यावेळी चीन नवीन खेळी करून नेपाळसारखीच भूतानला फूस लावून दोन देशांदरम्यान तनाव निर्माण करू शकतो. भारताने सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केली आहे. यामुळे चीनने काही कुरापत काढल्यास तातडीने जवानांना तैनात केले जाऊ शकते. भाजपाचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्विट करून डोकलामच्या स्थितीवर सरकारला सावध करत परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. स्वामी यांनी यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा हवाला देत 2017 मधील कराराला चीन आपल्या बाजुने रद्द करू शकते. 

चीनची माघार म्हणजे भुलभुलैय्याचीनने लडाखमधून घेतलेली माघार ही उद्याच्या कुठल्यातरी संकटाची चाहूल आहे. एक पाऊल मागे, दोन पावले पुढे या रणनितीवर चीन काम करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही फायद्यात राहू शकेल. या गोष्टी हेरल्याने भारताने चीनला अडून दाखवत चीनला अन्य ठिकाणी हालचाली करण्यास रोखत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामladakhलडाखIndian Armyभारतीय जवान