न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:36 AM2020-06-24T08:36:06+5:302020-06-24T08:37:07+5:30

अनलॉकडाऊन केल्यापासून गेल्या 18 दिवसांत इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पार रसातळाला गेलेल्या असताना केंद्र सरकार मात्र सामान्यांच्या खिशावर भार टाकत आहे.

OMG! For the first time, diesel is more expensive than petrol in Delhi | न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

Next

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली किंचित वाढ देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढवत आहे. गेल्या 18 दिवसांपासून सतत इंधनाचे दर 50 ते 60 पैशांनी वाढत असून (Petrol-Diesel price today) आज देशात कधीही न घडलेली गोष्ट घडली आहे. दिल्लीत पहिल्यादाच डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत काहीच वाढ झाली नाही. 


अनलॉकडाऊन केल्यापासून गेल्या 18 दिवसांत इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पार रसातळाला गेलेल्या असताना केंद्र सरकार मात्र सामान्यांच्या खिशावर भार टाकत आहे. याविरोधात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधनाचे दर कमी करावेत आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा फायदा लोकांना द्यावा अशी मागणी केली आहे. या काळात पेट्रोलचे दर 10.48 आणि डिझेलचे दर 8.50 रुपयांनी वाढले आहेत. 


बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किंमती वाढविल्या. दिल्लीमध्ये काल पेट्रोल आणि डिझेलची सारखीच किंमत होती. आज केवळ डिझेलची किंमत वाढविल्याने पेट्रोल 79.76 आणि डिझेल 79.88 रुपये प्रति लीटर झाले आहे. कालपेक्षा आज डिझेल 48 पैशांनी महागले आहे. दिल्लीच नाही परंतू साऱ्या देशात असे कधीही घडले नव्हते. 


देशभरात इतर ठिकाणी मात्र पेट्रोल डिझेलमध्ये कमालीचे अंतर आहे. महाराष्ट्रात हे अंतर 10 रुपयांचे आहे. दिल्लीने पेट्रोलवर कमी कर आकारत डिझेलवर जास्त कर लावला आहे. प्रदूषणामुळे डिझेलचा वापर कमी करावा हा त्यामागचा मूळ उद्देश असला तरीही महसूलही महत्वाचा असल्याने डिझेलवरील कर जास्त आहे. 2014 मध्ये इंधनाच्या किंमतींचे डिरेग्युलरायझेशन करण्यात आले आहे. यानुसार आता दिवसाला इंधनाच्या किंमती बदलल्या जातात. दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के आणि डिझेलवर 63 टक्के कर आकारला जातो. कर जवळपास समान असल्याने पेट्रोल आणि डिझेलमधील अंतर जवळपास समान झाले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

Read in English

Web Title: OMG! For the first time, diesel is more expensive than petrol in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.