अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:39 AM2020-06-23T11:39:50+5:302020-06-23T11:42:22+5:30

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता.

America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian | अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Next

नवी दिल्ली : दहशतवादाला समर्थव देण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्ताननेचीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा मोठा कट रचला होता. मात्र, हा डाव अमेरिकेने उधळून लावला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना  जैश-ए-मोहम्‍मद आणि मुंबई हल्ल्यातील आरोपी मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यावर पाकिस्तानने हा कट रचला होता. 


अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविल्याचा आरोप केला होता. हा पाकिस्तानचा प्रस्ताव अमेरिका रोखणार असल्याचे कळविण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या भारतीय कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनिअर वेनू माधव डोंगरा यांचेही नाव होते. 


पाकिस्तानला असे वाटत होते की चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये वेनू माधव यांना जागतिक दहशतवादी घोषित करता येईल. मात्र, पाकिस्तानचे काळे मनसुबे उधळले गेले आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षीच सप्टेंबरमध्ये हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या रोखला होता. तसेच पाकिस्तानला डोंगरा यांच्याविरोधात आणखी पुरावे देण्यास सांगितले होते. 


मात्र, पाकिस्तानने डोंगरा यांच्याविरोधात पुरावे सादर केले नाहीत. यामुळे अमेरिकेने हा प्रस्ताव अधिकृतरित्या रोखला आहे. यामुळे हा प्रस्ताव आता रद्द झाला आहे. जर पाकिस्तानला पुन्हा डोंगरा यांना यामध्ये अडकवायचे असेल तर पुन्हा नवा प्रस्ताव सादर करावा लागेल. 
पाकिस्तान डोंगरायांच्यावर कारवाई करून मसूद अझहरवरील बंदीचा बदला घेऊ इच्छित होता. मात्र, अमेरिकेमुळे तो पूर्णपणे फसला. याआधी चीनने मसूद अझहरविरोधात आलेल्या प्रस्तावांना चारवेळा विरोध करत रोखून धरले होते. मात्र, नंतर अमेरिकेने ताकद दाखवत अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. 


भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कधीही पाकिस्तानकडून ठोस पुरावे येतील याची अपेक्षा केली नव्हती. अझहरच्या प्रकरणात चीनने पाय आडवा घातला होता. मात्र, त्याची संघटनाच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केल्याने चीनलाही माघार घ्यावी लागली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

Web Title: America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.