Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:00 AM2020-06-23T11:00:01+5:302020-06-23T11:04:20+5:30

गेल्या वर्षी मारुतीने Maruti Suzuki S-Presso ही छोटी पण मस्कुलर बॉडी वाटणारी कार लाँच केली होती. तर Maruti Suzuki S-Presso CNG ला ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केले होते.

गेल्या वर्षी मारुतीने Maruti Suzuki S-Presso ही छोटी पण मस्कुलर बॉडी वाटणारी कार लाँच केली होती. तर Maruti Suzuki S-Presso CNG ला ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केले होते. तेव्हापासूनच या कारची वाट पाहिली जात होती. आज अखेर मारुतीने ही कार लाँच केली आहे.

Maruti S-Presso S-CNG ची किंमत 4.84 लाखांपासून सुरु होते. मारुतीने या सीएनजी कारचे चार व्हेरिअंट बाजारात आणले आहेत. LXi, LXi(O), VXi आणि VXi(O)असे हे व्हेरिअंट आहेत.

या चारही व्हेरिअंटच्या किंमतीमध्ये 10 ते 15 हजारांचा फरक आहे. LXi व्हेरिअंटची किंमत 4.84 लाख, LXi(O) ची किंमत 4.90 लाख, VXi ची 5.08 लाख आणि VXi(O) ची 5.14 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे.

मारुतीची ही नवीन कार एस प्रेसो सीनएजीवर 31.2 किमी प्रति किलोचे मायलेज देते. तर बाजारात आधीपासूनच असलेल्या पेट्रोल मॉडेलच STD आणि LXi व्हेरिअंट 21.4 किमी आणि VXi व VXI+ व्हेरिअंट 21.7 किमीचे मायलेज देते.

मारुती सुझुकीच्या या एस प्रेसोमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सीएनजी व्हेरिअंटमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात आले आहे.

हे पेट्रोल इंजिन 67 एपपीची ताकद आणि 90 एनएमचा टॉर्क निर्माण करते. तर सीएनजी मोडवर हे इंजिन 58 एचपी ताकद आणि 78 एनएम टॉर्क निर्माण करते.

एस प्रेसोच्या सीएनजी मॉडेलमध्ये केवळ 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाकी मूळ कारमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्हेरिअंटनुसार पेट्रोल मॉडेलसारखेच फिचर असणार आहेत. या मायक्रो एसयुव्हीमध्ये मिनी कूपरसारखे सर्क्युलर सेंटक कन्सोल, स्मार्ट प्ले डॉक आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फिचर देण्यात आले आहेत.

सुरक्षेसाठी ड्रायव्हर साईड एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्, चाईल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक आदी देण्यात आले आहे. तर ऑप्शनल (O) व्हेरिअंटमध्ये पॅसेंजर साईड एअरबॅगही देण्यात येते.