ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 11:49 IST2016-07-02T09:22:33+5:302016-07-02T11:49:50+5:30

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे.

Dhaka attack: 6 terrorists killed, 1 detained, 13 rescues of lazy | ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका

ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे. ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. मात्र लष्कराच्या जवानांनी दहशतवादयांना प्रत्युत्तर देत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडले.  जवानांनी काही परदेशी नागरिकांसह १३ ओलीसांची रेस्टॉरंटमधून सुखरूप सुटका केली. रेस्टॉरंटमधील गोळीबार आता थांबला असून १ दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळत आहे. 
 
आणखी वाचा :
(बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू)
  •  
 शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबादारी इसिसने (इस्लामिक स्टेट) स्वीकारली असून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार व बॉम्बहल्ले करत अनेक निरपराधांचे जीव घेतले. या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांसह पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. गेल्या १२ तासांहून अधिका काळापासून सुरू असलेली ही चकमक आता थंडावली असून अनेक ओलीसांना रेस्टॉरंटमधून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आल्याचे समजते.हल्ल्यातील जखमींना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
अनेक परदेशी पर्यटकांचा राबता असणारा ढाक्यातील 'गुलशन' परिसर महत्वपूर्ण मानला जातो. शुक्रवारी ( १ जुलै) रात्री ९ च्या सुमारास ८ ते १० दहशतवाद्यांनी आर्टिझन बेकरीत घुसून बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस व लष्कराने घटनास्थळी धाव घेत आसपासच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र रेस्टॉरंटमधील सुमारे ६० नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यातील काही जणांना ठारही केले.  त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान ढाका येथील भारतातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्प्ष्ट करण्यात आले आहे. 
  
 
हल्लेखोर अल्लाहू-अकबरच्या घोषणा देत रेस्टॉरंटमध्ये घुसले व  हा हल्ला केला असे ट्विट प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले.  


Web Title: Dhaka attack: 6 terrorists killed, 1 detained, 13 rescues of lazy