शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:04 IST

चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती.

जीनिवा/नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणुंचा संसर्ग झाल्याचे आम्हाला चीनने कळविलेच नाही. आम्हाला आमच्या तेथील कार्यालयाकडून त्याची माहिती मिळाली, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. चीनने ही बाब लपवूनच ठेवली, अशाच आरोग्य संघटनेचा स्पष्ट सूर आहे.आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती. त्यानंतर आरोग्य संघटनेने हे नेमके काय प्रकरण आहे, अशी विचारणा चीन सरकारकडे दोनदा केली. त्यानंतर ३ जानेवारी रोजी या विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली.जागतिक आरोग्य संघटनेचे पथक आता या प्रकरणाची बारकाईने तपासणी करणार असून, त्यासाठी आमच्या तज्ज्ञांचे पथक चीनला जाणार आहे, असे संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी दिल्लीत सांगितले. हा संसर्ग खरोखरच प्राण्यांपासून माणसापर्यंत झाला का, वटवाघळांपासूनच याची सुरुवात झाली का, याची तपासणी आमचे तज्ज्ञ करणार आहेत.याआधी अमेरिकेने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना संसर्गाच्या निमित्ताने टीका केली होती. चीनने या विषाणुंच्या संसर्गाची माहिती अन्य देशांना दिली नाही आणि जागतिक आरोग्य संघटना तरीही चीनची बाजू घेत आहे, असा आरोप करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य संघटनेचा निधी बंद करण्याची घोषणा केली होती.संसर्गाकडे गांभीर्याने पाहायला हवेआपण अद्याप कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच असून, दुसरा व मोठा टप्पा कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याची वाट न पाहता, आपण आतापासूनच त्याचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र तसे करताना सध्या ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक चक्र सुरळीत व्हायलाच हवे. त्यासाठी निर्बंध सरसकट शिथिल करून चालणार नाही. जिथे परिस्थिती गंभीर आहे, तिथे निर्बंध कडकच असायला हवेत. मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करायला हवे. अन्यथा फारच मोठे संकट निर्माण होईल, असे आरोग्य संघटनेच्या डॉ. मायकेल रेयॉन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीन