शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

तैवानच्या संसदेत हाणामारी, साहित्याची नासधूस, अनेक सभासद जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 13:10 IST

विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली.

ठळक मुद्देविरोधी कोउमितांग पक्षाच्या सदस्यांनी नामांकन भरण्यासाठी जात असलेले चेन चू यांना संसदेच्या मुख्य चेंबरमध्ये जाण्यापासून रोखले त्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये झाली हाणामारी तैवानची संसद हाणामारीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथे वादग्रस्त मुद्द्यांवरून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत असतात

ताईपै - संसदेच्या सभागृहामध्ये हाणामारी होण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. दरम्यान, आता तैवानच्या संसदेमध्ये सभासदांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत संसदेच्या इमारतीच्या काचा तुटल्या असून, काही सभासद जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली. विरोधी कोउमितांग पक्षाच्या सदस्यांनी नामांकन भरण्यासाठी जात असलेले चेन चू यांना संसदेच्या मुख्य चेंबरमध्ये जाण्यापासून रोखले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

या हाणामारीमध्ये कोऊमितांग पक्षाच्या एका सभासदाला गंभीर दुखापत झाली. तसेच संसदेच्या इमारतीच्या काचांचे नुकसान झाले. तसेच दोन्ही पक्षांचे अनेक सभासद जखमी झाले. तैवानची संसद हाणामारीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथे वादग्रस्त मुद्द्यांवरून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत असतात. चार वर्षांपूर्वी सरकारची सुधारणाविषयक धोरणे आणि निवृत्तीवेतनातील कपातीच्या मुद्द्यावरून तैवानच्या संसदेत जोरदार हाणामारी झाली होती.

दरम्यान, चेन चू यांची कंट्रोल युआनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ही संस्था सरकारच्या अन्य शाखांवर नजर ठेवण्याचे काम करते. मात्र कोऊमितांग पक्षाने या नियुक्तीला विरोध केला होता. कंट्रोल युआनमधील २७ सदस्यांपैकी २४ जण हे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे निकटवर्तीय आहेत. आम्ही भ्रष्ट लोकांच्या या यादीचा विरोध करतो. तसेच ही यादी मागे घेण्याचे मागणी करतो, असे कोऊमितांग पक्षाने सांगितले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयParliamentसंसद