शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:41 IST

Washington DC in worst situation: ट्रम्प यांच्या विनंतीनंतर वेस्ट व्हर्जिनियाने शेकडो नॅशनल गार्डना वॉशिंग्टनला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगासमोर आपले हसू करून घेत आहेत. जगातील युद्धे थांबविल्याचा दावा करत सुटले असून त्यांनी शांततेचा पुरस्कार देणाऱ्या नॉर्वे देशालाच धमकी देऊन टाकली आहे. अशातच या ट्रम्प महाशयांना  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील परिस्थिती आवरता येत नाहीय. ट्रम्प यांच्या विनंतीनंतर वेस्ट व्हर्जिनियाने शेकडो नॅशनल गार्डना वॉशिंग्टनला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. 

वॉशिंग्टन डीसीला गुन्हेगारी लोकांनी घेरल्याचे आणि उच्छाद मांडल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. निदर्शकांनी संघीय कायदा अंमलबजावणी आणि राष्ट्रीय रक्षक दलांना प्रचंड विरोध केला होता. यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळे ट्रम्प यांनी राजधानीत डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया होम रूल कायद्याचे कलम ७४० लागू केले होते. वॉशिंग्टन डीसीमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ती लवकरच दुरुस्त केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी नॅशनल गार्ड्स तैनात केले जात आहेत. त्यांना त्यांचे काम करण्यासाठी मोकळीक देत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. 

रिपब्लिकन प्रशासनाच्या विनंतीवरून ३०० ते ४०० लोकांचे पथक वॉशिंग्टनला पाठवत असल्याची घोषणा वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरिसी यांनी शनिवारी केली. ते उपकरणे आणि विशेष प्रशिक्षण सेवांसह वॉशिंग्टनला जातील. वेस्ट व्हर्जिनियासोबतच कॅरोलिना २०० आणि ओहियोने १५० गार्ड पाठविण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका