शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:47 IST

बेन ॲण्ड जेरीजचे सहसंस्थापक असलेल्या कोहेन यांनी आपण स्वतःच असे आइस्क्रीम बाजारात आणत असल्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला आहे.

पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी बेन कोहेन या सुप्रसिद्ध आइस्क्रीम उद्योजकाने कलिंगडाच्या स्वादाचे आइस्क्रीम तयार करण्याचा घाट घातला आहे. युनिलिव्हरची आइस्क्रीम कंपनी असलेल्या ‘बेन ॲण्ड जेरीज’ या प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँडने असे आइस्क्रीम तयार करण्याची कल्पना धुडकावल्यानंतर बेन ॲण्ड जेरीजचे सहसंस्थापक असलेल्या कोहेन यांनी आपण स्वतःच असे आइस्क्रीम बाजारात आणत असल्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला आहे.

‘जे त्यांना करायला जमलं नाही, ते मी करायचं ठरवलं आहे, मी एक कलिंगडाच्या स्वादाचं आइस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आइस्क्रीम गाझा पट्टीतील नागरिकांप्रति सहवेदनेचं प्रतीक म्हणून मी तयार करत आहे. गाझातील नुकसान भरून काढणं आणि तिथे शांतता नांदावी या मागणीचा पुरस्कर्ता म्हणून मी हे पाऊल उचलत आहे’, असं कोहेन यांनी आपल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं आहे.

बेन कोहेन हे बेन ॲण्ड जेरीज या ब्रँडचे सहसंस्थापक आहेत.  हा ब्रँड युनिलिव्हरने विकत घेतला. युनिलिव्हरने असं आइस्क्रीम बाजारात आणण्यास नकार दिल्यामुळे ‘बेन्स बेस्ट’ या नावाने कोहेन हे आइस्क्रीम स्वतःच बाजारात आणणार आहेत. कलिंगडामध्ये हिरवा, लाल, काळा आणि पांढरा हे चार रंग असतात. पॅलेस्टाइनच्या राष्ट्रध्वजातही हे चार रंग आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ‘कलिंगड’ हे पॅलेस्टिनी अस्मितेचं प्रतीक ठरलं आहे. म्हणूनच, कोहेन यांनी कलिंगडाच्या स्वादाचं आइस्क्रीम तयार करून पॅलेस्टाइनप्रति सहवेदना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती म्हणजे खाद्य जगतातील केवळ एक प्रयोग नसून ‘आइस्क्रीम ॲक्टिव्हिजम’ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

बेन कोहेन हे ज्यू असल्यामुळे त्यांची ही कृती अधिक महत्त्वाची आहे. कोहेन यांचा जन्म १९५१ मध्ये स्थलांतरित आई-वडिलांच्या पोटी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन भागात झाला. १९६३ मध्ये बेन कोहेन यांना त्यांचा व्यावसायिक भागीदार जेरी ग्रीनफिल्ड भेटला. दोघांनी पेनसिल्वानिया विद्यापीठात ‘आइस्क्रीम मेकिंग’चा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७८ मध्ये त्यांनी बेन ॲण्ड जेरीज आइस्क्रीम सुरू केलं. आवश्यक तेव्हा ठाम सामाजिक भूमिका घेणं ही या ब्रँडची खासियत ठरली. त्यालाच त्यांचा आइस्क्रीम ॲक्टिव्हिजम म्हणून ओळखलं जातं. हवामान बदलांपासून ते अनेक सामाजिक समस्यांवर त्यांनी वेळोवेळी भाष्य केलं आणि भूमिकाही घेतल्या.

ज्यू असून पॅलेस्टाइनच्या बाजूने इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात येत आहे. त्यावर उत्तरही त्यांनी स्वतःच दिले आहे. ‘मी ज्यू आहे. माझं कुटुंब ज्यू आहे,. माणसांना समानतेची वागणूक मिळावी असं मी मानतो, त्यामुळे मी अँटी इस्रायल किंवा अँटी ज्यू कसा ठरतो?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘आइस्क्रीमचं दुसरं नाव आनंद हे आहे! आनंद वाटला नाही तर त्यात काही मजा नाही आणि मला वाटतं, शांतता हा सगळ्यात उत्तम फ्लेव्हर आहे’, असं कोहेन यांनी पूर्वी म्हटलं आहे. आपल्या उक्तीला कृतीची जोड त्यांनी कलिंगडाच्या स्वादाच्या आइस्क्रीम निर्मितीतून दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Watermelon Ice Cream: Ben & Jerry's Founder Supports Palestine Amid Conflict

Web Summary : Ben & Jerry's co-founder, Ben Cohen, is launching watermelon ice cream to support Palestine. Rejected by Unilever, he's releasing it under 'Ben's Best'. Watermelon symbolizes Palestinian identity. Cohen, a Jew, faces criticism for his pro-Palestine stance, advocating for equality. He believes peace is the best flavor.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीPalestineपॅलेस्टाइन