इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 05:31 IST2026-05-06T05:30:02+5:302026-05-06T05:31:54+5:30
सोमवारी इराणने अमेरिकेवर हल्ला केल्याचा दावा केला होता. तो दावा अमेरिकेने फेटाळत इराणच्या सहा युद्धनौका उडवल्या असे सांगितले.

इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
दुबई : इराणशी झालेला युद्धविराम अद्याप कायम असून अमेरिकेच्या नौदलातील १५ हजाराहून अधिक सैनिक आणि १०० हून लष्करी विमाने पर्शियाच्या आखातातील सागरी मार्गाचे संरक्षण करत असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ आणि जॉइंट चीफ चेअरमन डॅन केन यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या संरक्षणात अमेरिकेच्या दोन जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझचा मार्ग पार केल्याची माहिती या दोघांनी दिली. गरज पडल्यास या प्रदेशात सैन्य संख्या वाढवण्याचा आम्ही विचार करू असे हेगसेथ म्हणाले.
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
सोमवारी इराणने अमेरिकेवर हल्ला केल्याचा दावा केला होता. तो दावा अमेरिकेने फेटाळत इराणच्या सहा युद्धनौका उडवल्या असे सांगितले. या घटनेवर इराणने युद्धविरामाचे अमेरिकेने उल्लंघन केल्याचा आरोप केला. पण अमेरिकेने हे हल्ले मोठ्या युद्धाच्या श्रेणीत येत नसल्याचा पवित्रा घेत तांत्रिकदृष्ट्या शांतता करार सुरूच असल्याचे सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे इराणला मदत करून कॅथलिक धर्मीयांना धोक्यात टाकत असल्याची टीका केली.