शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

न्यू यॉर्कपेक्षा बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:46 AM

मुंबई आठव्या स्थानी : सर्वोच्च दहा शहरांत पाच शहरे चीनमधील

न्यूयॉर्क : सर्वाधिक अब्जाधीशांचा निवास असणाऱ्या शहरांच्या यादीत चीनच्या बीजिंगने अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीवर मात करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्क सिटीमधील अब्जाधीशांच्या संख्येत केवळ नऊजणांची नव्याने भर पडली असताना बीजिंगमध्ये ३३ नवीन अब्जाधीश बनले आहेत. त्या बळावर बीजिंगने या यादीत चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्बेस नियतकालिकाने जारी केलेल्या अहवालानुसार,  बीजिंगमध्ये आता १०० जण अब्जाधीश असून न्यूयॉर्क सिटीपेक्षा एक अब्जाधीश बीजिंगमध्ये अधिक आहेत. एकूण शुद्ध संपत्तीच्या बाबतीत मात्र न्यूयॉर्क सिटी प्रथम स्थानी आहे. बीजिंगमधील अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ४८४ अब्ज डॉलर असून न्यूयॉर्क सिटीमधील अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ५६० अब्ज डॉलर आहे. मायकेल ब्लूमबर्ग हे न्यूयाॅर्क सिटीतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अब्जाधीशांचा निवास असलेल्या जगातील सर्वोच्च १० शहरांत पाच शहरे चीनमधील आहेत. चीनचेच हाँगकाँग (८० अब्जाधीश) तिसऱ्या स्थानी आहे. शेनझेन, शांघाय आणि हांगझोऊ ही यादीतील इतर चिनी शहरे आहेत.या यादीत मुंबई हे भारतातील एकमेव शहर असून मुंबईत ४८ जण अब्जाधीश आहेत.  यादीत आठव्या स्थानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षी १० नव्या  अब्जाधीशांची भर पडली. भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत ठरलेले मुकेश अंबानी मुंबईकर असून गेल्या वर्षी त्यांची संपत्ती दुपटीने वाढून ८५ अब्ज डॉलर झाली. सर्वोच्च १० दहा शहरांत अमेरिकेची दोन शहरे असून भारतासह रशिया व ब्रिटन यांचे प्रत्येकी एक शहर आहे.अब्जाधीशांचा निवास असलेली टॉप-१० शहरे (अब्जाधीशांची संख्या)बीजिंग      (१००)न्यूयॉर्क सिटी     (९९)हाँगकाँग     (८०)मॉस्को     (७९)शेनझेन     (६८)शांघाय     (६४)लंडन     (६३)मुंबई     (४८)सॅनफ्रॅन्सिस्को     (४८)हांगझोऊ     (४७)