शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

एलियन्स असतील तर नवे धर्म उदयास येतील, शस्त्रास्त्रांवर वारेमाप खर्च होईल: बराक ओबामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 4:18 PM

अंतराळात यूएफओ (UFO) दिसल्याच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील वादात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

अंतराळात यूएफओ (UFO) दिसल्याच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील वादात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. एलियन्सचं अस्तित्व जर सिद्ध झालं तर जगात अनेक लोकांच्या धार्मिक भावना बदलतील आणि जगभरात स्वत:ला संरक्षणदृष्टा समृद्ध करण्यासाठी संरक्षण सामग्रीवर वारेमाप खर्च केला जाईल, असं विधान बराक ओबामा यांनी केलं आहे. एलियन्सच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर क्रांतीकारी बदल घडतील असंही ते म्हणाले. (Barack Obama Says Proof Of Aliens & Ufo Will Lead To New Religions And Military Spending)

एलियन्सचं अस्तित्व सिद्ध झालं तर नव्या धर्मांचा उदय होईल. यासोबतच एलियन्समुळे होणाऱ्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी जगात शस्त्रास्त्रांची मागणी लक्षणीयरित्या वाढेल. यात देश शस्त्रास्त्र खरेदीसाठी वारेमाप खर्च करत सुटतील, असं ओबामा म्हणाले. यासोबतच एलियन्सच्या अस्तित्वानं वैयक्तिक आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदलणार नाही, असंही ते म्हणाले. अमेरिकेच्या सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी अनेकदा यूएफओ दिसल्याची माहिती दिल्याचा मुद्दा ताजा असतानाच बराक ओबामा यांनी एलियन्सबाबतचं हे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. यूएफओबाबत कोणतीही माहिती नाही: गुप्तचर अधिकारी

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बराक ओबामा यांना एलियन्स जर पृथ्वीवर आले तर त्याबाबत तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर ओबामा यांनी तो क्षण अतिशय रोमांचक असेल असं म्हटलं. "एलियन्स असल्याचं सिद्ध झालं तर माझे विचार पूर्णपणे बदलणारी घटना ठरेल. कारण आजवर मी संपूर्ण अंतराळात आपल्याच ग्रहावर जीवंत प्राण्यांचं अस्तित्व आहे असं मानत आलो आहे. पण यात कोणतच दुमत असू शकत नाही की असं जर झालं तर आपल्याला शस्त्रास्त्रांच्याबाबतीत पूर्णपणे सज्ज राहावं लागेल. इतकंच नव्हे, तर एलियन्सच्या येण्यानं नव्या धर्मांचाही इथं उगम होईल", असं ओबामा म्हणाले. 

दरम्यान, अमेरिकेच्या सैनिकांना आकाशात यूएफओ दिसल्याचं वृत्त सीबीएस न्यूजनं दिलं होतं. तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या तपासात अशाप्रकारचं कोणत्याही यूएफओच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिका