शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

"४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन करणार", बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:06 IST

Bangladesh Protests : बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) देशाला संबोधित केले.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्या भारताकडे येण्यासाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना देश सोडून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या घटनेनंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) देशाला संबोधित केले. लष्करप्रमुख म्हणाले की, देशात ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. शेख हसीना बांगलादेशचे पंतप्रधानपद सोडून भारतातील आगरतळा शहरात रवाना झाल्या आहेत.

दरम्यान, बांगलादेशी विद्यार्थी गेल्या महिन्यापासून शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करत होते. हे आंदोलन खूपच हिंसक झाले होते. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले आणि तोडफोड केली. 

काय म्हणाले लष्करप्रमुख?लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान म्हणाले की, पंतप्रधान हसीना यांनी राजीनामा दिला आहे, अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतो. गेल्या काही आठवड्यात झालेल्या सर्व हत्यांचा तपास करू. तसेच, लष्कराने सर्व जबाबदारी घेतली आहे. सर्व हत्येचा खटला चालणार आहे. आपण सर्वांनी संघर्ष न करता शांततेच्या मार्गावर परत येऊ या. मी सर्व जबाबदारी घेतो, असेही लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्वसमावेशक सरकारबाबत राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे. त्यापैकी बीएनपी, जमात इस्लाम अमीर, मामुनुल हक, डॉ. आसिफ नजरुल चर्चेत होते. मात्र, अवामी लीगचे कोणीही नव्हते, असे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान म्हणाले. दरम्यान, आंदोलक करणाऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी केले आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय