अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने अयातुल्ला खामेनेई बंकरमध्ये! मुलाने हाती घेतली इराणची सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:50 IST2026-01-25T17:49:23+5:302026-01-25T17:50:04+5:30

Ayatollah Khamenei News: इराण-अमेरिका युद्ध २०२६: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने इराणमध्ये खळबळ, खामेनेई भूमिगत.

Ayatollah Khamenei News: Ayatollah Khamenei in bunker due to fear of US attack! Son takes over Iran's power? | अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने अयातुल्ला खामेनेई बंकरमध्ये! मुलाने हाती घेतली इराणची सत्ता?

अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने अयातुल्ला खामेनेई बंकरमध्ये! मुलाने हाती घेतली इराणची सत्ता?

तेहरान/नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका स्फोटक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या दिशेने अमेरिकन नौदलाचा मोठा ताफा रवाना केल्याचे जाहीर केल्यानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी तेहरानमधील एका अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत बंकरमध्ये आश्रय घेतल्याचे वृत्त आहे.

अमेरिकन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी खामेनेई यांना एका सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. हा बंकर आधुनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या काळात खामेनेई यांचा मुलगा मोजताबा खामेनेई याने इराणच्या कामकाजाची धुरा आपल्या हाती घेतल्याची चर्चा आहे. तो सध्या इराणच्या विविध कार्यकारी शाखांशी संवाद साधण्याचे मुख्य माध्यम बनला आहे.

युद्धाचे ढग दाटले
इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईमुळे मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. या गोंधळाचा फायदा घेऊन अमेरिका किंवा इस्रायल इराणच्या नेतृत्वावर हल्ला करू शकतात, अशी भीती इराणला सतावत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इशारा दिला आहे की, खामेनेई यांच्यावरील कोणताही हल्ला हा थेट युद्धाची घोषणा मानली जाईल आणि इराण त्याला 'जिहाद' म्हणून प्रत्युत्तर देईल.

इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनीही स्पष्ट केले आहे की, खामेनेई यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास इराण अत्यंत कठोर पाऊल उचलेल. सध्या मध्यपूर्वेत परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून जगाचे लक्ष ट्रम्प यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागले आहे.

Web Title : अमेरिकी खतरे के बीच अयातुल्ला खमेनी बंकर में; बेटे ने संभाली सत्ता?

Web Summary : अमेरिकी तनाव के बीच, अयातुल्ला खमेनी कथित तौर पर बंकर में हैं। उनके बेटे, मोजतबा, कथित तौर पर ईरानी मामलों का प्रबंधन कर रहे हैं। आंतरिक अशांति और संभावित युद्ध के कारण अमेरिकी या इजरायली हमलों का डर बढ़ रहा है।

Web Title : Ayatollah Khamenei in Bunker Amid US Threat; Son Assumes Power?

Web Summary : Amid US tensions, Ayatollah Khamenei is reportedly in a bunker. His son, Mojtaba, is allegedly managing Iranian affairs. Fears of US or Israeli attacks rise due to internal unrest and potential war.

टॅग्स :Iranइराण