शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपलच्या संस्थापकाचे स्मारक उद्ध्वस्त

By admin | Updated: November 5, 2014 01:50 IST

जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात उभारलेले स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले आहे

मॉस्को : जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात उभारलेले स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले आहे. जॉब्ज यांचे वारसदार व कंपनीचे सध्याचे मुख्य अधिकारी टीम कुक यांनी ते गे अथवा समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर हा उत्पात घडविण्यात आला आहे. आयफोनच्या स्वरूपातील ६ फूट उंचीचे स्टीव्ह जॉब्ज यांचे स्मारक जानेवारी २०१३ मध्ये रशियातील झेफ्स कंपनी समूहातर्फे उभारण्यात आले होते. अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी गेल्या गुरुवारी समलिंगी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर रशियातील नियमानुसार हे स्मारक उद्ध्वस्त करावे लागले, असे झेफ्सने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियात समलिंगी संबंधांना बंदी आहे. शिवाय हे स्मारक तरुण विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात होते. त्यामुळे शुक्रवारी ते उद्ध्वस्त करण्यात आले. रशियातील पारंपरिक मूल्यांचा आदर ठेवण्यासाठी अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी गतवर्षी अल्पवयीन मुलात समलिंगी विचार प्रसारित करण्यास बंदी घातली होती. हा कायदा लहान मुलांना या विचारापासून संरक्षण देण्यासाठी असून, रशियात समलिंगी लोकांबाबत कोणताही भेदाभेद केला जात नाही, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले होते; पण तरीही या कायद्यानंतर आपल्या समस्या वाढल्या, असे समलिंगी गटांचे म्हणणे आहे. झेप्स किंवा पश्चिम युरोपियन आर्थिक कंपन्यांकडून रशियात विविध क्षेत्रांतील उद्योग चालवले जातात, त्यात रियल इस्टेट, बांधकाम, जाहिरात व अर्थपुरवठा या उद्योगांचा समावेश आहे. नागरी अधिकार अधिक बळकट व्हावेत यासाठी आपण समलिंनी असल्याची कबुली देत आहोत, असे टीम कुक यांनी म्हटले होते; पण अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज हे समलिंगी नव्हते. (वृत्तसंस्था)