बलुचिस्तानात पुन्हा हाहाकार! बीएलएच्या ऑपरेशन हेरॉफ २.० मध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:20 IST2026-01-31T17:18:54+5:302026-01-31T17:20:24+5:30

हत्वाचे म्हणजे, 'बलुच लिबरेशन आर्मी'ने (BLA) या हल्ल्याला 'ऑपरेशन हेरोफ' २.० असे म्हटले आहे.

Another tragedy in Balochistan bla targets 10 cities 12 Pakistani soldiers killed in BLA's Operation Herof 2 | बलुचिस्तानात पुन्हा हाहाकार! बीएलएच्या ऑपरेशन हेरॉफ २.० मध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानात पुन्हा हाहाकार! बीएलएच्या ऑपरेशन हेरॉफ २.० मध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत पुन्हा एक हाहाकार सुरू झाला आहे. बलुच बंडखोरांनी आज एकाच वेळी जवळपास १० शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्था 'आयएसआय' (ISI) च्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले. महत्वाचे म्हणजे, 'बलुच लिबरेशन आर्मी'ने (BLA) या हल्ल्याला 'ऑपरेशन हेरोफ' २.० असे म्हटले आहे.

बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी क्वेटासह नोशकी, माष्टुंग, दलबदिन, कलाट, खारन, ग्वादर, पसनी, टंप आणि बुलेडा या शहरांमध्ये हे हल्ले करण्यात आले. यांतील, क्वेटा, ग्वादर आणि पसनी येथे मजीद ब्रिगेडने 'फिदाईन' हल्ले केले. यावेळी ते सैनिकांच्या कॅम्पमध्येही शुरले होते. या हल्ल्यांत आतापर्यंत १२ हूनही अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. 

याशिवाय, माष्टुंग आणि कलाटमध्ये बंडखोरांनी थेट पोलीस इमारतींवरच ताबा मिळवत, तेथून पोलिसांना हुसकावून लावले. याशिवाय, समुद्राकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरही हल्ले करण्यात आले. जेणेकरून सैन्य तुकड्यांच्या हालचाली रोखता येतील.

या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी सैन्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य  करण्यात आलेले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी जबरदस्त गोळीबार सुरू आहे. या चकमकीत एकट्या क्वेटा शहरात ७ पोलीस कर्मचारी ठार झाले असून ३ बलुच बंडखोरही मारले गेल्याचे समजते.

बंडखोरांनी उपायुक्तांना बनवलं बंदी -  
आज पहाटे ६ वाजल्यापासून बीएलएने हल्ले सुरू केले आहेत. याशिवाय त्यांनी नोशकीचे उपायुक्त मोहम्मद हुसेन यांना बंदी बनवले. याचा एक व्हिडिओही त्यांनी प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी स्वतः बंडखोरांच्या ताब्यात असल्याचे मान्य केले आहे. सध्या क्वेटातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 

Web Title : बलूचिस्तान में बीएलए का ऑपरेशन हेरोफ़ 2.0; सैनिक मारे गए।

Web Summary : बलूचिस्तान में बीएलए के ऑपरेशन हेरोफ़ 2.0 से फिर हाहाकार। कई शहरों में पाकिस्तानी सेना और आईएसआई ठिकानों पर हमले हुए। फिदायीन हमले और पुलिस इमारतों पर कब्ज़ा किया गया। कम से कम 12 पाकिस्तानी सैनिक मारे गए, झड़पें जारी और एक अधिकारी बंदी।

Web Title : Balochistan rocked by BLA's Operation Herof 2.0; soldiers killed.

Web Summary : Balochistan faces renewed turmoil as BLA's Operation Herof 2.0 targets Pakistani military and ISI sites across multiple cities. Attacks involved 'fidayeen' assaults and seizing police buildings. At least 12 Pakistani soldiers are reported dead, with ongoing clashes and a captured official intensifying the crisis.