शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:07 IST

New Jersey Plane Crash: अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे  धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले.

Aircraft Crash in US: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात सुमारे २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झला होता. दरम्यान, या अपघाताला महिना उलटत नाहीत तोच अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे  धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. सुदैवाने एवढा भीषण अपघात घडल्यानंतरही विमानामध्ये आग लागली नाही. त्यानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना विमानातून बाहेर काढले. तसेच पाच प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे विमान गुरुवारी सकाळी न्यूजर्सी  विमानतळाच्या धावपट्टीवरून पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. या विमानामध्ये १५ प्रवासी होते. ग्लोस्टर कौंटी आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, मुनरो विमानतळावर आपातकालिन बिगुल वाजल्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. विमान कोसळल्यानंतर बाहेरील मैदानी परिसरामध्ये अडकले. सुदैवाने विमानाचा वेग कमी असल्याने त्यांना फार नुकसान झालं नाही.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, आम्ही या अपघाताचा तपास सुरू केला आहे. विमान अपघात झाला तेथी जखमींना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ओहियो येथेही एक विमान अपघात झाला होता. त्यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

या अपघातात कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही. हे विमान स्कायडायव्हिंगशी संबंधित होते. कदाचित तांत्रिक बिघाड, वैमानिकाची चूक किंवा खराब हवामानामुळे ते अपघातग्रस्त झाले असावे, असे एफएएने म्हटले आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातUnited Statesअमेरिकाairplaneविमान