इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'? अमेरिकेने हल्ला केला अन् हिंदमहासागरात बुडाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 08:21 IST2026-03-05T08:15:53+5:302026-03-05T08:21:48+5:30

अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणचे सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीचे युद्धपोत 'IRIS Dena' याला क्षेपणास्त्र डागून समुद्रात बुडवले आहे.

America's devastating strike in the Indian Ocean; Iran's modern warship 'IRIS Dena' sunk! | इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'? अमेरिकेने हल्ला केला अन् हिंदमहासागरात बुडाली!

इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'? अमेरिकेने हल्ला केला अन् हिंदमहासागरात बुडाली!

हिंद महासागराच्या निळ्या पाण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणचे सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीचे युद्धपोत 'IRIS Dena' याला क्षेपणास्त्र डागून समुद्रात बुडवले आहे. या भीषण हल्ल्यात इराणच्या ८७ नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, हे युद्धपोत भारतात आयोजित 'मिलन २०२६' या नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेमुळे आखाती देशांसह संपूर्ण जगाचे लक्ष आता हिंद महासागराकडे लागले असून, अमेरिका-इराणमधील तणाव युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकी घटना काय?

भारतीय नौदलाच्या 'मिलन २०२६' या बहुराष्ट्रीय सरावात सहभागी होण्यासाठी इराणचे 'IRIS Dena' हे युद्धपोत विशाखापट्टणम येथे आले होते. हा सराव संपवून मायदेशी परतत असताना, हिंद महासागराच्या खोल पाण्यात अमेरिकेच्या एका स्टेल् पाणबुडीने या जहाजाला लक्ष्य केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी केली असून, "इराणविरोधातील लढाईत आमची पोहोच जगाच्या पाठीवर कुठेही असू शकते, याचा हा पुरावा आहे," असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

श्रीलंकेकडून मृतदेहांचा शोध

हल्ल्यानंतर जहाजाचे प्रचंड नुकसान झाले आणि ते काही वेळातच समुद्रात गडप झाले. या परिसरात बचाव कार्यासाठी धावलेल्या श्रीलंका नौदलाने आतापर्यंत ८७ मृतदेह बाहेर काढले आहेत. इराणच्या नौदलासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जाणारा धक्का आहे.

इराणसाठी 'IRIS Dena' का महत्त्वाचे होते?

'IRIS Dena' हे केवळ एक जहाज नव्हते, तर इराणच्या लष्करी ताकदीचे ते प्रतीक होते. मोज-क्लास श्रेणीतील हे फ्रिगेट इराणने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले होते. यामध्ये पहिल्यांदाच 'व्हर्टिकल लॉन्च सिस्टम' बसवण्यात आली होती, जी कोणत्याही कोनातून क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम होती. यावर 'कादिर' अँटी-शिप क्रूझ मिसाइल आणि हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी 'सय्याद' मिसाइल तैनात होते. या जहाजावर 'Asr 3D' फेज्ड अ‍ॅरे रडार होते, जे शत्रूला शेकडो मैल दूर असतानाच टिपू शकत होते.

अमेरिकेची सायलंट ताकद

सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन पाणबुडी इतक्या शांतपणे 'पेरिस्कोप डेप्थ'वर आली की इराणच्या रडारला त्याचा सुगावाच लागला नाही. जेव्हा इराणच्या सैन्याला धोका लक्षात आला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अमेरिकन नौदलाने सांगितले की, त्यांच्या हल्ल्यात जहाजाचा मुख्य भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, ज्यामुळे ते सावरण्याची कोणतीही संधी इराणला मिळाली नाही.

भारताच्या 'मिलन' सरावातून परतताना घात

फेब्रुवारी महिन्यात भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सहकार्य वाढवण्यासाठी 'मिलन २०२६' या मेगा नेव्हल एक्सरसाईजचे आयोजन केले होते. यामध्ये जगातील अनेक देशांच्या नौदलांनी आपली ताकद दाखवली होती. पण हा सराव संपवून आनंदाने परतणाऱ्या इराणी नौसैनिकांवर काळाने अमेरिकेच्या रूपात झडप घातली.

Web Title : हिंद महासागर में अमेरिकी पनडुब्बी ने ईरानी युद्धपोत को डुबोया; तनाव बढ़ा।

Web Summary : खबर है कि एक अमेरिकी पनडुब्बी ने हिंद महासागर में ईरान के उन्नत युद्धपोत, आईआरआईएस डेना को डुबो दिया, जिसमें 87 नाविक मारे गए। यह घटना भारत के 'मिलन 2026' नौसैनिक अभ्यास से जहाज के लौटने के दौरान हुई, जिससे अमेरिका-ईरान के बीच तनाव बढ़ गया और वैश्विक ध्यान आकर्षित हुआ।

Web Title : US submarine sinks Iranian warship in Indian Ocean; tensions soar.

Web Summary : An American submarine reportedly sank Iran's advanced warship, IRIS Dena, in the Indian Ocean, killing 87 sailors. The incident occurred as the ship returned from India's 'Milan 2026' naval exercise, escalating US-Iran tensions and drawing global attention.