अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 06:06 IST2026-05-05T06:04:26+5:302026-05-05T06:06:29+5:30

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे.

America's big blow to Iran! Destroying 6 warships, opening the 'Strait of Hormuz' | अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली

अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली

दुबई : होर्मुजच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्या इराणच्या सहा युद्धनौकांना अमेरिकेने उद्ध्वस्त केले असून हा महत्त्वाचा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सोमवारी अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम राबवण्यास सुरूवात केल्याने इराणने हल्ले सुरू केले आहेत.

ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”

यूएईवर इराणचे हल्ले

सोमवारी इराणने यूएईच्या फुजैराह येथील तेल केंद्रावर चार क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. या हल्ल्याने तेलकेंद्राला मोठी आग लागली आहे. चार पैकी तीन क्षेपणास्त्रे निकामी तर एक क्षेपणास्त्र समुद्रात पाडल्याचा दावा यूएईने केला आहे. या घटनेची माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे.

१५ हजार सैनिक आणि १०० विमानांची मदत घेत अमेरिकेने अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहीम सुरू केली आहे.

Web Title : अमेरिका का ईरान पर बड़ा हमला, होर्मुज जलडमरूमध्य खुला; यूएई तेल केंद्र पर हमला।

Web Summary : अमेरिका ने होर्मुज जलडमरूमध्य में ईरान के छह युद्धपोतों को नष्ट कर दिया, जिससे व्यापार के लिए जलमार्ग खुल गया। इसके बाद, ईरान ने कथित तौर पर यूएई के एक तेल केंद्र पर हमला किया, जिसमें तीन भारतीय घायल हो गए। अमेरिका ने फंसे जहाजों को सुरक्षित करने के लिए सैन्य सहायता के साथ 'प्रोजेक्ट फ्रीडम' शुरू किया।

Web Title : US strikes Iran, opens Hormuz Strait; UAE oil center hit.

Web Summary : The US Navy destroyed six Iranian warships in the Strait of Hormuz, opening the waterway for trade. Following this, Iran allegedly attacked a UAE oil facility, injuring three Indians. The US initiated 'Project Freedom' with military support to secure stranded ships.