शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:22 IST

Rahmanullah Lakanwal US White House firing: हल्लेखोर आधीच तिथे थांबला होता. संधी मिळताच त्याने गोळीबार केला.

Rahmanullah Lakanwal US White House firing: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड सदस्यांसह तीन जण गंभीर जखमी झाले. व्हाईट हाऊसपासून काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या फरागुट स्क्वेअरजवळ ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे. नॅशनल गार्डचे जवान परिसरात गस्त घालत असताना त्याने गोळीबार सुरू केला. हल्लेखोर आधीच तिथे थांबला होता. संधी मिळताच त्याने गोळीबार केला. हा हल्लेखोर नेमका कोण आहे? याची माहिती समोर आली आहे.

गोळीबार करणारी व्यक्ती कोण?

या घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीच्या सुरक्षेसाठी आणखी ५०० नॅशनल गार्ड जवान तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाबाबत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की हल्लेखोर जखमी झाला आहे, परंतु त्याला त्याच्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डवर गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव रहमानउल्लाह लकनवाल असे सांगण्यात येत आहे. तो २९ वर्षांचा असून तो अफगाणिस्तानचा नागरिक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर काही अफगाणिस्तानींना अमेरिकेत आणण्यात आले होते. रहमानउल्लाह हा त्यापैकी एक आहे. रहमानउल्लाह लकनवाल याचे एक अफेसबुक पेज देखील आहे, ज्यावर अफगाण ध्वजाचा प्रोफाइल फोटो आहे. प्रोफाइल फोटोनुसार, तो वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे राहत होता.

या घटनेवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी या प्रकरणावर सांगितले की गोळीबार करणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, त्याला त्याच्या या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही आमच्या नॅशनल गार्ड्सच्या सोबत आहोत. सर्व लष्कराला आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना देवाचे आशीर्वाद असू देत. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमच्यासोबत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Who is the shooter targeting National Guards in Washington? Details revealed

Web Summary : In Washington D.C., a shooting injured three, including two National Guard members. The suspect, Rahmanullah Lakanwal, a 29-year-old Afghan national who entered the U.S. in 2021, is in custody. President Trump ordered 500 more National Guard troops for D.C. security.
टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिकाFiringगोळीबारAfghanistanअफगाणिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प