शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:52 IST

Israel vs Iran: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणी हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमानांसाठी आणखी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय विमानांना गुजरातवरून समुद्रातून वळसा घालून इराणच्या हवाई क्षेत्रातून जावे लागत होते. परंतू, आता इस्रायलनेइराणवर हल्ले केल्याने इराणने आपले हवाई क्षेत्र देखील बंद करून टाकले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांना आपला मार्ग बदलावा लागला आहे. 

इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणी हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमानांसाठी आणखी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीहून इंग्लंड, अमेरिका आणि इतर युरोपीय देशांना जाणाऱ्या विमानांना आता लांबचा मार्ग पत्करावा लागत आहे. भारतीय तसेच भारताकडे ये-जा करणाऱ्या परदेशी विमानांना भारतात येण्यासाठी आता सौदी अरेबियाच्या आकाशातून जावे लागणार आहे. 

इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे शुक्रवारी त्यांच्या लांब पल्ल्याच्या १६ उड्डाणे वळवावी लागल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी विमानांची व्यवस्था केली जात असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. लंडन हीथ्रो-मुंबई विमानसेवा व्हिएन्ना, न्यू यॉर्क-दिल्ली ते शारजाह आणि न्यू यॉर्क-मुंबई ते जेद्दाह अशी वळवण्यात आली. लंडन हीथ्रो-दिल्ली विमानाला मुंबईत उतरविण्यात आले. 

युरोपिय देशांचा मार्गाचे अंतर हे सुमारे ७००० किमी पेक्षा जास्त आहे, त्यानुसार विमानात इंधन भरले जाते. परंतू, मार्ग बदलावा लागल्याने इंधन कमी झाले व अनेक विमानांना मुंबईतच उतरविण्यात आले आहे. तिथून या प्रवाशांना दिल्लीत आणण्यासाठी वेगळी विमाने तयार ठेवण्यात आली होती. दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-103 दिल्लीला परत येत आहे. इंडिगोने देखील प्रवासाचा वेळ वाढणार असल्याची सूचना केली आहे. 

 

टॅग्स :IranइराणAir Indiaएअर इंडियाIsraelइस्रायल