Israel Iran War: ९ युद्धनौका, ४८ बड्या नेत्यांचा खात्मा, ४० लष्करी कमांडर्स ठार; युद्धात इराणचे मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:51 IST2026-03-02T10:47:36+5:302026-03-02T10:51:23+5:30

America Israel- Iran War Updates: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे अतोनात नुकसान झाले असून, संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.

9 warships, 48 senior leaders killed, 40 military commanders killed; Iran suffers huge losses in the war! | Israel Iran War: ९ युद्धनौका, ४८ बड्या नेत्यांचा खात्मा, ४० लष्करी कमांडर्स ठार; युद्धात इराणचे मोठं नुकसान!

Israel Iran War: ९ युद्धनौका, ४८ बड्या नेत्यांचा खात्मा, ४० लष्करी कमांडर्स ठार; युद्धात इराणचे मोठं नुकसान!

मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचले आहे. गेल्या ४८ तासांत अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या लष्करी कारवाईत इराणचे अतोनात नुकसान झाले असून, यामध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह देशातील अनेक बड्या नेत्यांसह लष्करी कमांडर्स यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, इराणच्या ९ युद्धनौकाही बुडवण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या मोहिमेच्या यशाची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, "या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४८ इराणी नेते मारले गेले आहेत. आम्हाला मिळालेल्या यशावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, इतकी ही मोठी कारवाई आहे. अमेरिकन नौदलाने इराणच्या ९ युद्धनौका बुडवल्या असून इराणी नौदलाचे मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यांच्या नौका लवकरच समुद्राच्या तळाशी तरंगताना दिसतील."

इस्रायली डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसावी यांच्यासह ४० लष्करी कमांडर मारले गेले आहेत. सर्वोच्च नेते खामेनी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली, ज्यात इराणच्या लष्कराचेही मोठे नुकसान झाले आहे.

इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला. या भीषण संघर्षात ३ अमेरिकन सैनिक ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले असल्याची अधिकृत माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. दरम्यान, इराणने अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला असून युद्धनौका सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.

हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणी क्षेपणास्त्रांनी आता युएई, कतार, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि जॉर्डन या देशांनाही लक्ष्य केले आहे. यामुळे संपूर्ण मध्य पूर्व प्रदेश युद्धाच्या खाईत लोटला गेला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.

Web Title : ईरान को भारी नुकसान: संघर्ष में प्रमुख नेता, युद्धपोत नष्ट

Web Summary : अमेरिकी-इजरायली सैन्य कार्रवाई से ईरान को भारी क्षति हुई, नेता और कमांडर मारे गए। नौ युद्धपोत नष्ट हो गए, और क्षेत्रीय तनाव बढ़ गया, जिससे पड़ोसी देश भी संघर्ष में आ गए।

Web Title : Iran Suffers Heavy Losses: Key Leaders, Warships Destroyed in Conflict

Web Summary : US-Israel military action caused significant damage to Iran, killing leaders and commanders. Nine warships were destroyed, and regional tensions escalated, drawing in neighboring countries amidst conflicting reports of attacks.