Savani Brothers: अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आणि व्हिसा प्रणालीला चुना लावणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकन न्यायालयाने ऐतिहासिक आणि कडक शिक्षा सुनावली आहे. भास्कर सवानी आणि अरुण सवानी या दोन भावांना विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांत तब्बल ८३५ वर्षांच्या एकत्रित कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी काही काळापूर्वी अमेरिकेच्या एफबीआय प्रमुखांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
भास्कर सवानी यांना ४२० वर्षांची तर अरुण सवानी यांना ४१५ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. तर त्यांची सहकारी अलेक्झांड्रा राडोमिक यांना ४० वर्षांच्या शिक्षेची शक्यता आहे.
कसा केला मेडिकेड घोटाळा?
सवानी ग्रुपने अमेरिकेतील गरिबांसाठी असलेल्या मेडिकेड या आरोग्य योजनेतून कोट्यवधी डॉलर्स लाटले. त्यांनी डेंटल क्लिनिक्सचे एक जाळे तयार केले होते. ज्या क्लिनिक्सची पात्रता संपली होती तरी त्यांच्या नावानेही त्यांनी सरकारला बिलं पाठवून पैसे उकळले. इतकेच नाही तर, एखादा डॉक्टर परदेशात गेलेला असतानाही त्याच्या नावाचा वापर करून शस्त्रक्रियांचे खोटे दावे सादर केले. या संपूर्ण घोटाळ्यात अमेरिकन सरकारचे ३० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
H-1B व्हिसा आणि कामगारांचे शोषण
सवानी भावांनी केवळ आरोग्य सेवेतच नाही, तर व्हिसा प्रक्रियेतही मोठी फसवणूक केली. प्रामुख्याने भारतातून कामगारांना अमेरिकेत आणण्यासाठी त्यांनी खोटे व्हिसा अर्ज सादर केले. अमेरिकेत आणल्यानंतर या कामगारांना मिळणाऱ्या पगारातील काही हिस्सा जबरदस्तीने परत घेतला जात असे. हा सर्व काळा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून पांढरा करून स्वतःच्या चैनीसाठी वापरला गेला.
खटल्यादरम्यान समोर आलेली सर्वात भयानक बाब म्हणजे, या भावांनी मानवी वापरासाठी परवानगी नसलेली डेंटल इम्प्लांट्स रुग्णांच्या शरीरात बसवली. अन्न आणि औषध प्रशासनाची कोणतीही मान्यता नसताना, रुग्णांच्या संमतीशिवाय हे धोकादायक प्रयोग करण्यात आले.
खाजगी खर्च दाखवला 'बिझनेस' खर्च
स्वतःच्या मुलांची कॉलेज फी, घराचा टॅक्स आणि देखभालीचा खर्च या भावांनी बिझनेस खर्च म्हणून दाखवून टॅक्सची देखील मोठी चोरी केली. तपासात असे आढळले की, हे भाऊ अत्यंत विलासी जीवन जगत होते आणि त्यामागे हा सर्व घोटाळ्याचा पैसा होता.
कोर्टाचा निकाल आणि पुढील प्रक्रिया
कोर्टाने या दोघांना रॅकेट चालवणे, व्हिसा फसवणूक, आरोग्य सेवा फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरी अशा अनेक गंभीर कलमान्वये दोषी ठरवले आहे. जुलै २०२६ मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या फेडरल कोर्टात त्यांच्या शिक्षेची अधिकृत सुनावणी पूर्ण होईल.
Web Summary : Two Indian-American brothers, Bhaskar and Arun Savani, received 835 years combined for healthcare and visa fraud. They defrauded Medicaid, exploited workers, and used unapproved dental implants, amassing millions. Their lavish lifestyle was funded by these illegal activities.
Web Summary : भारतीय मूल के भास्कर और अरुण सवानी को हेल्थकेयर और वीजा धोखाधड़ी में 835 साल की सजा हुई। उन्होंने मेडिकेड में हेराफेरी की, कर्मचारियों का शोषण किया और बिना मंजूरी वाले डेंटल इम्प्लांट का इस्तेमाल किया, जिससे करोड़ों कमाए।