शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

४८ मदरशांवर कारवाई होणार

By admin | Updated: June 7, 2015 12:41 IST

पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या सरकारने राज्यातील ४८ मदरशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरशात मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रेरित केले जाते, असा आरोप आहे.

कराची : पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या सरकारने राज्यातील ४८ मदरशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरशात मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रेरित केले जाते, असा आरोप आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री कायम अली शाह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीमंत्री शार्जील इनाम मेमन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. देशातील ४८ मदरशांत देशविघातक कारवाया चालतात याचे पक्के पुरावे आमच्याकडे आहेत, असे मेमन यांनी सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्या स्रोतांवरही कारवाई केली जाणार आहे. पाकिस्तानात २५ हजारांपेक्षा जास्त मदरसे असून, वेगवेगळ्या संघटनांतर्फे ते चालविले जातात. (वृत्तसंस्था)मलाला युसूफझईच्या ८ हल्लेखोरांची सुटका४मलालावरील हल्ल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या दहा आरोपीपैकी आठ जणांना पाकिस्तानात मोकळे सोडण्यात आले आहे. एप्रिलमध्ये न्यायालयाने हल्ल्यात सहभागी दहा आरोपींना २५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र या आठ जणांविरोधात पुरेसा पुरावा नसल्याने त्यांना मुक्त करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.१०७ अब्ज डॉलरची आर्थिक हानी४दहशतवादाच्या विळख्यामुळे पाकिस्तानची १०७ अब्ज डॉलरची हानी झाली असल्याचे एका सरकारी दस्तावेजात म्हटले आहे. हा दस्तावेज अर्थमंत्री इशाक दार यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक राष्ट्रीय आर्थिक सर्वेक्षणाचा एक भाग आहे. सकारात्मक बाजू म्हणजे यशस्वी लष्करी मोहिमांमुळे सुरक्षा स्थितीत सुधारणा होऊन सलग चौथ्या वर्षी दहशतवादाशी संबंधित हानीचे प्रमाण खाली आले. ४कारवाई करण्याआधी विफकुल मदारीस या मदरशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेला विश्वासात घेऊनच पुढचे पाऊल टाकले जाणार आहे, असे मेमन म्हणाले.