शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:42 IST

मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते

सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. रात्री १.३० वाजता बसमधून प्रवास करत ते मक्काहून मदीनाला चालले होते. त्यावेळी अचानक ही बस डिझेल टँकरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे मोठी आग भडकली. त्यात ४० हून अधिक भारतीय मृत्युमुखी पडले. 

माहितीनुसार, मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या अपघातस्थळी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. 

या घटनेबाबत खासदार असदुद्दीन औवेसी यांनी सांगितले की, मलाही आत्ताच या अपघाताची माहिती मिळाली. हैदराबाद येथील २ ट्रॅव्हल एजन्सी लोकांना घेऊन मक्का मदिना येथे गेले होते. तिथे अपघातात बसला भीषण आग लागली. त्यात १ वगळता इतर कुणीही वाचले नाही असं कळतंय. मी तिथल्या राजदूत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेदेखील अपघाताची माहिती घेत आहेत. परराष्ट्र मंत्र्‍यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी. या घटनेतील प्रवाशांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जावेत. जखमींना योग्य ते उपचार मिळावेत अशी माझी भारत सरकारकडे मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, या अपघातात ४ जण वाचल्याचे कळत आहे. या जखमींवर मदीनाच्या अल हमना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे. रात्री १.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली, ज्यावेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. या अपघातात बस संपूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic Saudi Arabia Bus Crash Kills 42 Indian Pilgrims

Web Summary : A devastating bus accident in Saudi Arabia killed 42 Indian pilgrims traveling from Mecca to Medina. The bus collided with a diesel tanker, causing a massive fire. Many women and children from Telangana and Hyderabad are among the deceased. Four survivors are receiving treatment.
टॅग्स :Accidentअपघातsaudi arabiaसौदी अरेबिया