शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांचे चाक मंदावले : कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक क्षेत्राला मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरूही झाल्या आहेत. मात्र कंपनीला पुरविला जाणारा कच्चा माल आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एखाद्या मशीनचा पार्ट बदलायचा म्हटला तरी इतर दुकाने बंद असल्याने मोठी अडचण येत आहे. त्यामुळे कंपनी बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे. काही कंपन्यांनी उत्पादन सुरू ठेवले असले तरी बाहेर मालाला उठाव नसल्याने मालाचे उत्पादन तरी कशाला करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प पडला आहे. एकीकडे उद्योग ठप्प पडत असताना दुसरीकडे मात्र मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक मजुरांच्या हाताला काम नसल्याने हतबल झाले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुरू उद्योग

हिंगोली -३५

वसमत - १२

कळमनुरी - २

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

ब्रेक द चेनमध्ये औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी उत्पादित मालाला बाहेर उठाव नाही. त्यात कच्चा माल आणताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहेत. कामगारांनाही काम मिळत नाही. मालाची विक्री होत नसतानाही बँक मात्र हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहे.

- रमेश पंडीत, उद्योजक

औद्योगिक वसाहती सुरू रहाव्यात, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र ब्रेक द चेनमुळे बाजारपेठेत बंधने आहेत. कंपनीतील मशीनचा एखादा पार्ट आणायचा असला तरी बाजारपेठ बंद असल्याने आणता येत नाही. कच्चा मालही आणताना अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका कामगारांनाही बसत आहे.

-आर. एस. केदार,

उपअभियंता, एमआयडीसी, उपविभाग परभणी

कच्चा माल मिळण्यात अडचणी

हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योग फार मोठे नाहीत. त्यामुळे माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल इतर जिल्ह्यातून मागवावा लागतो. शिवाय मशीनचे पार्टही येथे मिळत नाहीत. कच्चा माल मिळाला तरी आणायचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या बहुतांश मोठ्या शहरात ब्रेक द चेनमुळे संचारबंदी लागू आहे. यामुळेच अडचणीत भर पडत आहे.

कामगारांच्या प्रतिक्रिया

औद्योगिक वसाहत सुरू असली तरी बहुतांश उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या सुरू असल्या तरी तेथे पोहचायचे कसे? ये-जा कशी करायची ?

-अंकुश पंडित

शासनाने औद्योगिक वसाहत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र कच्चा माल मिळत नसल्याने कंपनी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

-अरुण वाढवे