शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:15 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण उत्सहात साजरा केला जाणार आहे. ३० आॅगस्ट रोजी पोळा सण ३१ आॅगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण उत्सहात साजरा केला जाणार आहे. ३० आॅगस्ट रोजी पोळा सण ३१ आॅगस्ट रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे.कर सणानिमित्ताने पोलीस ठाणे कुरुंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षणा घालण्यासाठी येतात. त्यामुळे वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी होते. सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते.या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेत वसमत टी पार्इंट ते नागेशवाडीपर्यंत रहदारीचा रस्ता हा ३१ आॅगस्ट २०१९ चे 00.00 ते २४ वाजेपावेतो बंद करण्यात येणारआहे. त्यामुळे नांदेडकडूनयेणारी वाहतूक वसमतमार्गे झिरो फाटा ते हट्टा जवळा बाजारमार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे जाईल. तर औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येणारआहे.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची माहितीपोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.४त्याकरीता वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा बंद करण्यात येत असून, नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा- जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पयार्यी मागार्ने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेड जाणारी वाहने नागेशवाडी, मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीcultureसांस्कृतिक